बेफिक्रेचे ‘लबों का कारोबार’ साँग रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 20:24 IST
रणवीर सिंग व वाणी कपूर यामध्ये दोघेही एकमेकांचे किस करीत असताना दिसत आहे
बेफिक्रेचे ‘लबों का कारोबार’ साँग रिलीज
रणवीर सिंग व वाणी कपूरचा यांच्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटाचे ‘लबों का कारोबार’ गाणे रिलीज झाले आहे. यामध्ये दोघेही एकमेकांचे किस करीत असताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे सर्वचे पोस्टर हे दोघे किस करताना दिसत आहेत. या गाण्यासोबत एक पोस्टर रिलीज करण्यात आले. या नवीन पोस्टरमध्ये रणवीर व वाणी एकमेकांचे किस करीत असल्याचे दिसत आहे. लव्हस्टोरीची सुरुवात कशी होते, ते यामध्ये दाखविण्यात आले आहे. तरुण, वृद्ध व समलिंगी हे सर्व एकमेकांचे किस करीत असल्याचे दिसत आहेत. बेफिके्रसाठी अभिनेता रणवीर सिंगने आपल्या शरीरासाठी खूप मेहनत घेतलेली असून, त्याने यासाठी वैयक्तिक प्रशिक्षक लॉयड स्टीवंस सोबत पॅरिसमध्ये ट्रेनींग घेतले आहे. स्टीवंसने ट्विटरवर रणवीरच्या नवीन लूकचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी रणवीर व स्वत: चा एक्सरसाईज करतानाचाही एक फोटो शेअर केला आहे. ‘लगता है कि इससे यह साफ होगा जो कुछ प्रमुख बदलाव रणवीर ने बेफिक्रे के लिए किए है’. असे लिहीले आहे. आदित्य चोपडा हा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. शाहरुख खान व अनुष्का शर्मा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन त्यांने केले होते.