Join us  

'केदारनाथ'मधील 'नमो नमो शंकरा' गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 9:00 PM

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा आगामी चित्रपट 'केदारनाथ'मधील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेदारनाथ चित्रपट ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा आगामी चित्रपट 'केदारनाथ'मधील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. 'नमो नमो शंकरा', असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात केदारनाथचे विहंगम नयनरम्य दृश्य पाहायला मिळते आहे.

उत्तराखंड येथील केदारनाथच्या महाप्रलयावर आधारित 'केदारनाथ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे.  दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी या गाण्याचे ट्रॅक ट्विटरवर शेअर केले आणि लिहिले की, 'धनत्रयोदशी'च्या शुभपर्वावर भोलेनाथचे नाव घेऊ, चला यात्रेला प्रारंभ करू'. 

 

‘केदारनाथ’ चित्रपटात सारा आणि सुशांतची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत पिट्टूची तर सारा मुक्कू नामक पर्यटकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.‘केदारनाथ’ या चित्रपटाने सुरूवातीला बरेच वाद ओढवून घेतले. निर्माती प्रेरणा अरोरा आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यातील वाद कोर्टापर्यंत पोहोचला. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होत. शूटिंग सुरू असतानाच प्रेरणाने निर्मितीतून माघार घेतल्याने अभिषेकसमोर मोठा पेच उभा राहिला होता. अखेर रॉनी स्क्रूवालाने निर्मितीची जबाबदारी स्विकारली आणि ‘केदारनाथ’चा मार्ग सुकर झाला. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. 

टॅग्स :केदारनाथसुशांत सिंग रजपूतसारा अली खान