Join us  

अनन्या पांडेच्या बॉलिवूड डेब्यूआधी सोशल मीडियावर चर्चा होतेय तिच्या हॉट बहिणीची

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 2:53 PM

अनन्या लवकरच चित्रपटसृष्टीत येत असली तरी सध्या तिच्यासोबतच तिच्या एका बहिणीची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देअलाया अतिशय हॉट असून ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. 5 लाख 10 हजार पेक्षा अधिक लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.

अनन्या पांडे स्टुंडट ऑफ द इयर 2 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रचंड गाजला होता. करणने स्टुंडट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भटला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. आता स्टुंडट ऑफ द इयर 2 मध्ये अनन्या आणि तारा सुतारिया असे दोन नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  या चित्रपटात अनन्याची जोडी टायगर श्रॉफ सोबत जमली असून या चित्रपटातील तिच्या लुक्सची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अनन्या पांडे ही प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी असून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. तिला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून अनन्याच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. आता अनन्या चित्रपटात अभिनय कशी करते याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. 

अनन्या लवकरच चित्रपटसृष्टीत येत असली तरी सध्या तिच्यासोबतच तिच्या एका बहिणीची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तिची चुलत बहीण अलानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अलाया अतिशय हॉट असून ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. 5 लाख 10 हजार पेक्षा अधिक लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. अलानाच्या अनेक फोटोंमध्ये आपल्याला अनन्या आणि तिचा भाऊ अहान यांना देखील पाहायला मिळत आहे. 

अलाना चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेची मुलगी असून चिक्की हा व्यवसायिक आहे. त्याची पत्नी लेखिका डेने पांडे आहे. अलानाचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ फॅशन मध्ये झाले असून तिने मनीष मल्होत्रा या प्रसिद्ध डिझायनरसोबत काम केले आहे. 

अलाना फॅशन डिझायनर मोनिषा जयसिंहचा मुलगा युदी जयसिंहसोबत नात्यात असल्याचे म्हटले जाते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती अनेकवेळा त्याच्यासोबत फोटो पोस्ट करत असते.

टॅग्स :अनन्या पांडे