Join us  

​या कारणामुळे प्रतीक बब्बरने मीडियाला सांगितले त्याच्या ड्रग्स अॅडिक्शनविषयी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 9:55 AM

बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीत अथवा कोणत्याही इंडस्ट्रीतील कलाकार असो त्याला आपल्या खाजगी जीवनाविषयी भाष्य करायला आवडत नाही आणि त्यातही त्या ...

बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीत अथवा कोणत्याही इंडस्ट्रीतील कलाकार असो त्याला आपल्या खाजगी जीवनाविषयी भाष्य करायला आवडत नाही आणि त्यातही त्या कलाकाराचे खाजगी जीवन हे वादग्रस्त असले किंवा त्याच्या खाजगी आयुष्यात काही वादळं आली असतील तर कलाकार त्याच्याविषयी न बोलणेच पसंत करतात. पण या सगळ्याला प्रतीक बब्बर हा अपवाद ठरतो. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा असलेल्या प्रतीकने जाने तू जाने ना या चित्रपटापासून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. प्रतीक हा लंबी रेस का घोडा आहे असेच सगळ्यांना वाटत होते. पण नंतरच्या काळात प्रतीकचे करियर ढासळत गेले. प्रतीक आता अभी तो पार्टी शुरू हुई है या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. रिचा चड्डा, सौरभ शुक्ला, विनय पाठक, दिव्या दत्ता, पवन मल्होत्रा, मनोज पावा अशी या चित्रपटाची तगडी स्टार कास्ट असल्याने या चित्रपटात काम करणे प्रतीक चांगलेच एन्जॉय करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान गप्पा मारताना प्रतीक सांगतो, मी माझ्या खऱ्या आयुष्यात कसा आहे हे लोकांना माहीतच नव्हते. माझी एक वेगळी इमेज लोकांमध्ये होती. त्यांना माझ्या ड्रग्स अॅडिक्शनविषयी काहीच कल्पना नव्हती. मी केवळ एक चांगला अभिनेता आणि नेहमी अतिशय आनंदी असलेला व्यक्ती आहे असेच माझ्या फॅन्सना वाटत होते. पण त्यांच्या मनात माझी निर्माण झालेली छबी पूर्णपणे चुकीची आहे हे मला चांगलेच माहीत आहे. खरं सांगू तर मला हे सगळे पटत नव्हते. मी पूर्णपणे ड्रग्सच्या आहारी गेलो होतो. मला माझा स्वतःचा देखील तिरस्कार वाटायचा. मी त्या काळात खूपच दुःखी असायचो. लोकांना माझी ही खरी बाजू काय आहे? मी आयुष्यात कोणत्या गोष्टींना तोंड दिले आहे हे कळावे असे मला नेहमीच वाटत होते. त्यामुळे मी माझ्या ड्रग्स अॅडिक्शन्सविषयी माझ्या फॅन्सना सांगायचे ठरवले. Also Read : बिकिनी अवतारात दिसली राज बब्बरची होणारी सून; गोव्यात करीत आहे हॉलिडे एन्जॉय!