Join us

तर या कारणामुळे दोन वर्ष इंडस्ट्रीतून गायब झाला होता हनी सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 15:16 IST

बॉलिवूडमध्ये पंजाबी रॅपर हनी सिंग सध्या गायब झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हनी सिंगचे एकही गाणंही रिलीज झालेले नाही. ...

बॉलिवूडमध्ये पंजाबी रॅपर हनी सिंग सध्या गायब झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हनी सिंगचे एकही गाणंही रिलीज झालेले नाही. लोकांना माहिती नाही हनी सिंग नेमका कुठे आहे तो. त्यांचे फॅन्स तो बॉलिवूडमध्ये कधी परततो आहे याची वाट बघतायेत.     
हनी सिंग सध्या वेगळ्या एक वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हनी सिंग गायब आहे. हाच सध्या त्याच्या चर्चेचा विषय आहे. मात्र आता त्यांनी स्वत:च सांगितले आहे की तो सध्या घरी आहे. यामागे एक खूप मोठे कारण आहे.  
यो यो हनी सिंग गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. तो सध्या सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळतो. याच कारण आहे त्याला बायपोलर डिसऑर्डर नावाच्या आजाराने ग्रासले आहे. हनीने स्वत:च हि गोष्ट त्याच्या फॅन्ससोबत शेअर केली आहे. माझी अवस्था इतकी वाईट होती की मी ही गोष्ट आपल्या फॅन्सपर्यंत पोहोचवू शकलो नाही. तसेच मी कोणत्या रिहेब सेंटरमध्ये नसून नोएडामधल्या आपल्या घरी असल्याचे देखील तो म्हणाला. गेल्या महिन्यांमध्ये त्याच्यावर चार डॉक्टरांचे उपचार सुरु होते अशी माहितीही त्याने दिली होती.  गेल्या अनेक महिन्यांपासून तो गायब झाल्यामुळे त्याच्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा देखील झाल्या. काहींनी तो अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे म्हटले होते.
 यो यो हनी सिंग लवकरच इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करु शकतो. यासाठी तो तयारीला देखील लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हनी सिंग एवढे दिवस घरात राहिल्यामुळे त्याचे वजन खूपच वाढले आहे. सध्या हनी आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी मेहनत घेतो आहे. तसेच हनी संदर्भात आणखीन एक गोष्ट स्पॉटबॉय ईने प्रसिद्ध केली आहे.  ‘स्पॉटबॉय ई’च्या रिपोर्टनुसार रॅपर हनी सिंगच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिले जाणार आहे. या पुस्तकात त्याचा प्रवास लिहिली जाणार आहे. त्यावर बेतलेल्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठीचे अधिकार देण्यासाठी त्याला २५ कोटींची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे.