Join us  

शिल्पा शेट्टीने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट, हे आहे या मागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 7:31 PM

काही वर्षांपूर्वी शिल्पाला तिचा नवरा राज कुंद्राने दुबईतील बुर्ज खलिफामध्ये एक फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला होता. मात्र, शिल्पाने तो फ्लॅट विकला.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज ४६ वा वाढदिवस साजरा करते आहे. शिल्पा ग्लॅमरस लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत येत असते. तिच्या वाढदिवसानिमित्त अनेक महागडे भेटवस्तू मिळत असतात. मात्र, काही वर्षांपूर्वी शिल्पाला तिचा नवरा राज कुंद्राने दुबईतील बुर्ज खलिफामध्ये एक फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला होता. मात्र, शिल्पाने तो फ्लॅट विकला.

राज कुंद्राने शिल्पाला २०१० मध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलीफाच्या १९ व्या फ्लोअरवर ५० कोटींचा एक फ्लॅट भेट म्हणून दिला होता. मात्र, काही दिवसांनी शिल्पाने तो फ्लॅट विकला. कारण त्या फ्लॅटमध्ये जागा कमी होती आणि त्या फ्लॅटच्या खिडक्या उघडू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांचा मुलगा विवानला त्रास व्हायचा कारण त्याला मोकळ्या जागेत रहायला आवडते.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने २००९ मध्ये लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विवान त्यांच्या मुलाचे नाव आहे तर समीक्षा त्यांच्या मुलीचे नाव आहे.शिल्पा शेट्टीने ‘बाजीगर’ या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले.

तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

शिल्पा शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती निकम्मा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि गायिका शर्ले सेतिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मिजान जाफरीसोबत हंगामा २मध्ये दिसणार आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर शिल्पा शेट्टी रुपेरी पडद्यावर कमबॅक करते आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा