Join us

वाचा राजकारणात जाण्याविषयी काय सांगतेय रिचा चड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 10:12 IST

रिचा चड्डाने खूपच कमी वर्षात बॉलीवूड मध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. तिचा दास देव हा चित्रपट नुकताच ...

रिचा चड्डाने खूपच कमी वर्षात बॉलीवूड मध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. तिचा दास देव हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. या चित्रपटानंतर तिचा अभी तो पार्टी शूरु हुइ है हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच लखनऊ येथे झाले. या चित्रपटाच्या सेटवर तिच्याशी मारलेल्या गप्पा...तुझ्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दास देव या चित्रपटात तू एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत आहेस, तुला भविष्यात राजकारणात यायला आवडेल का?मी राजकारणात जाऊ शकेन असे मला कधीच वाटत नाही. कारण राजकारणात गेल्यावर तुमची तत्व तुम्हाला बाजूला ठेवायला लागतात. अनेक वेळा तुमची इच्छा असूनही तुम्हाला काम करता येत नाही. त्यामुळे मी या क्षेत्रापासून दोन पाऊल दूर राहायचेच ठरवले आहे. पण शिकलेल्या, अभ्यासू लोकांनी या क्षेत्रात येणे गरजेचे आहे. आज काल बलात्काराचे आरोप असलेले लोक देखील या क्षेत्रात असलेले आपल्याला दिसून येतात. अशा लोकांना या क्षेत्रापासून दूर करणे हे आपल्या सारख्या लोकांच्या हातात आहे.बॉलीवूड मध्ये कास्टिंग काऊचचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. तू फिल्मी बॅकराउंड नसलेल्या कुंटुंबातून आली आहेस, तुला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता का?माझ्या सोबत कोणी अशा प्रकारचे वागायची हिंमत देखील करू शकत नाही. मी प्रत्येकाशी वागताना त्यांची जागा काय आहे हे त्यांना नक्कीच दाखवून देते. आजवर मी केवळ माझ्या मेहनतीमुळे इथपर्यंत पोहोचू शकले आहे. सगळ्यांनीच काम करताना आपली इज्जत आणि आपले नाव मातीत मिसळू नये असे मला वाटते. तुझ्या घरातील कोणीही सदस्य चित्रपटसृष्टीचा नाहीये, त्यामुळे या क्षेत्रात येण्याच्या तुझ्या निर्णयावर कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती?माझे आई वडील दोघेही खूपच शिकलेले आहेत. त्यांच्यासाठी शिक्षणाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. पण असे असले तरी प्रत्येकाने आपला निर्णय स्वतः घ्यायला पाहिजे असे त्या दोघांचे म्हणणे आहे. त्यामुळे मला चित्रपटसृष्टीत करियर करायचे आहे या माझ्या निर्णयाला त्यांनी पाठिंबाच दिला आणि ते दोघेही माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. अभी तो पार्टी शुरू हुइ है या चित्रपटाची दिव्या दत्ता, प्रतीक बब्बर, पवन मल्होत्रा, मनोज पावा, विनय पाठक आणि सौरभ शुक्ला अशी दमदार स्टार कास्ट आहे, या चित्रपटाचे चित्रीकरण करताना किती मजा मस्ती तुम्ही करत आहात?या चित्रपटात एका पेक्षा एक दिग्गज कलाकार आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळत आहे. सेटवर रोजच पार्टीचे वातावरण असते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा करत असून एक वेगळ्या पठडीतला चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.Also Read : ट्रोलरने म्हटले, ‘तू पैशांसाठी नाचतेस, निघून जा पाकिस्तानात’, रिचा चढ्ढाने दिले रोखठोक उत्तर!