Join us

​रणवीर म्हणतो, मी तर अभिनयाचा विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:05 IST

आपणच सर्वांत चांगला अभिनय करू शकतो अशा आविर्भावातून रणवीर सिंग बाहेर पडू पाहतोय. मी जगातला सर्वांत चांगला अ‍ॅक्टर आहे ...

आपणच सर्वांत चांगला अभिनय करू शकतो अशा आविर्भावातून रणवीर सिंग बाहेर पडू पाहतोय. मी जगातला सर्वांत चांगला अ‍ॅक्टर आहे असे मानणाºया रणवीरचे डोळे उघडले कसे? असा प्रश्न नक्कीच तुम्हालाही पडला असेल. आदित्य चोपडासोबत ‘बेफ्रिके ’मध्ये काम करताना, तो स्वत:ला अभिनयाचा विद्यार्थी मानू लागलाय.आपल्या पहिल्याच चित्रपटातून क्रिटीक्सची प्रशंसा मिळविणाºया रणवीर सिंगला आता अभिनयातील गांभीर्य कळू लागेल आहे. तो म्हणतो, आता कुठे मी अभिनय शिकण्यास सुरुवात के ली आहे. सुरुवातीला मला असे वाटत होते की, मला सर्वच कळते. पण आता तसे काहीच राहिले नाही. आता मला वाटते की ही तर सुरुवात आहे. मी काम केलेल्या चित्रपटांची संख्या वाढत असतानाच मला असे वाटू लागले आहे की, मला सर्व गोष्टी कळत नाहीत. जेव्हा जेव्हा मी सेटवर जातो तेव्हा तेव्हा मला असे वाटते की मी सर्व विसरलो आहे. बँड बाजा बारातमध्ये काम करताना  मला सर्वच गोष्टी माहिती आहेत मी जगातला सर्वांत चागंला अ‍ॅक्टर आहे असे वाटत होते. पण आता सर्व या उलट घडतेय अशीही पुश्ती त्याने जोडली. सध्या ज्या चित्रपटात मी काम क रतोय तेव्हा मला असे वाटते की, मला फार काही कळत नाही, मला हे समजले आहे की, ही कला अमर्याद आहे व अभिनय क्षेत्रातील संधी खूप मोठ्या आहेत, याचा विस्तार होतच राहणार असे मला वाटायला लागले आहे.  रणवीरमध्ये झालेला हा बदल नक्कीच प्रसंशनीय आहे. त्याला जमिनीवर आणण्याचे श्रेय आदित्य चोप्रा यांनाच द्यावे लागेल. नाही का? त्याच्याकडून आपण चांगल्या अभिनयाची अपेक्षा करूया!!!