रणवीर सिंगच्या अपोझिट सारा करणार डेब्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 17:17 IST
बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटातून एक स्टारकिड पदार्पण करणार असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. सैफ अली खान व ...
रणवीर सिंगच्या अपोझिट सारा करणार डेब्यू!
बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटातून एक स्टारकिड पदार्पण करणार असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून, ती जोया अख्तर दिग्दर्शित चित्रपटात रणवीरच्या अपोझिट दिसणार असल्याचे कळतेय. बॉलिवूडला नव्या जनरेशनची चाहूल लागली आहे. अनेक स्टारकिड्स पदार्पणासाठी सज्ज झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. आथिया शेट्टीनंतर तिचा भाऊ अयान लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करतोय. श्रीदेवीची मुलगी जान्हवीच्या पदार्पणासाठी तिचे वडील बोनी कपूर प्रयत्न करीत आहेत. करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट आॅफ दि इअर २’ मधून सैफ व अमृताची मुलगी पदार्पण करणार होती अशा बातम्यांना ऊत आला होता. मात्र या बातम्या चुकीच्या असल्याचे खुद्द अमृताला सांगावे लागले होते. साराने तिचे करिअर स्वत: निवडले असल्याचे ती म्हणाली होती. जोया अख्तरच्या आगामी चित्रपटातून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे असे सांगण्यात येते आहे. जोया अख्तर ‘गल्ली बॉईस्’ नामक चित्रपटावर काम करीत आहे. या चित्रपटात सारा भूमिका करणार असल्याचे सांगण्यात येते. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याचे मानले जात आहे. मुंबईच्या चाळीत राहणारा एक युवक कसा रॉकस्टार होतो हे यात दाखविण्यात येणार आहे. यात चाळीतल्या ‘रॉकस्टार’ची भूमिका रणवीर सिंग करणार आहे. तर अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी साराशी बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.रणवीर सिंगने यापूर्वी जोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात काम केले आहे. रणवीर सध्या संजय लीला भन्साळीच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.