Join us  

या ठिकाणी करणार रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण न्यू- ईअर सेलिब्रेशन !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 8:29 AM

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण एक असे कपल आहे ज्यांच्या रिलेशनशिपची चर्चा बॉलिवूडमध्ये नेहमीच असते.  दोघांनी संजय लीला भन्साळींच्या ...

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण एक असे कपल आहे ज्यांच्या रिलेशनशिपची चर्चा बॉलिवूडमध्ये नेहमीच असते.  दोघांनी संजय लीला भन्साळींच्या तीन चित्रपट एकत्र काम केले आहे. रणवीर आणि दीपिकाने अजूनपर्यंत त्यांचे नातं कधी अधिकृतपणे स्वीकारले नाही. मात्र कधी आपलं नातं लपवलं ही नाही. दोघांची ऑन स्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री लजवाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघे एकत्र नव्या वर्षाचे स्वागत करणार आहोत. रिपोर्टनुसार हे कपल 2018च्या स्वागताच्या तयारी लागले आहे.    पिंकविलाच्या रिपोर्टनुसार रणवीर नुकताच मुंबई एअरपोर्ट दिसला. तो आपल्या कामासाठी श्रीलंकेला गेला आहे तर दीपिका पादुकोण सध्या ऑस्ट्रियामध्ये आहे. लवकरच दीपिका रणवीरला श्रीलंकेत ज्वाईन करणार आहे. याठिकाणी दोघे एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंट करणार आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांनी एक मॅग्झिनला इंटरव्ह्यू दिला आहे. यावेळी दीपिकाला प्रश्न विचारण्यात आला की, रणवीरसोबत सगळ्यात जास्त तुला काय आवडते यावर दीपिकाने उत्तर दिले की, जेव्हा आम्ही दोघे एकत्र असतो त्यावेळी आम्हाला कोणत्याच गोष्टीची किंवा कुणाचीच गरज लागत नाही. कधी आमच्यामध्ये बुद्धिक चर्चा होते, कधी फक्त शांतता असते तर कधी कधी अगदी लहान मुलांसारखो वागतो आहे.        तर रणवीरला विचारण्यात आले की दीपिका पादुकोणने तुला या कठिण चित्रपटात (पद्मावती) काम करताना कशी मदत केली. रणवीर हसत म्हणाला की, माझा या चित्रपटात तिच्यासोबत एक ही सीन नाही आहे. मात्र हे बघून छान वाटत की कुणी आहे ज्याला तुमच्यावर विश्वास आहे.    ALSO RAED : दीपिका पादुकोणच्या पप्पांशी वाढतेयं रणवीर सिंगची सलगी? पण कशासाठी?दीपिका आणि रणवीरचा पद्मावती चित्रपट कधी रिलीज होणार या गोष्टीवरुन अजून ही पडद्या उठलेला नाही. 1 डिसेंबरला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र दिवसंदिवस चित्रपटाच्या रिलीजला होणाराविरोध वाढ चालला आहे. त्यामुळे आता अशी चर्चा आहे की मार्च 2018 पर्यंत चित्रपट रिलीज होईल. यात दीपिका आणि रणवीरसोबत शाहिद कपूरची महत्त्वाची भूमिका आहे.