Join us  

'या' महिन्यात सुरु होणार राणी मुखर्जीच्या 'मर्दानी2' चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 9:00 PM

राणी मुखर्जी ‘मर्दानी’चा सीक्वल घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाली आहे. 'मर्दानी 2'चे शूटिंग राणी मुबंईतून सुरु करणार आहे. 

ठळक मुद्देदिग्दर्शक गोपी पुथरन या सीक्वलचे दिग्दर्शन करणार आहेराणीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलची निर्मिती असणार आहे

राणी मुखर्जी ‘मर्दानी’चा सीक्वल घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमाचे शूटिंग राणी मार्चचा तिसऱ्या आठवड्यात करणार आहे. यात राणी पोलीस अधिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. २१ वर्षीय खलनायकाशी राणीचा सामना होताना दिसणार आहे. मर्दानी 2 चे शूटिंग राणी मुबंईतून सुरु करणार आहे. 

काही महिन्यांपूर्वी ट्रेड एक्स्पर्ट  तरुण आदर्श यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर ‘मर्दानी 2’ची घोषणा केली होती. राणी मुखर्जी लवकरच ‘मर्दानी 2’ घेऊन येतेय, असे त्यांनी जाहिर केले होते.‘मर्दानी’ माझा आवडता सिनेमा आहे. हा रिलीज झाला तेव्हाच ‘मर्दानी 2’ कधी येणार, असे लोकांनी विचारणे सुरु केले होते. आता ‘मर्दानी 2’ची घोषणा झालीय. मला आशा आहे की, चाहत्यांना यामुळे आनंद होईल, असे राणी म्हणाली होती. 

दिग्दर्शक गोपी पुथरन या सीक्वलचे दिग्दर्शन करणार आहेत. गोपी यांनीच ‘मर्दानी’ची पटकथा लिहिली होती. राणीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलची निर्मिती असणार आहे. २०१९ च्या अखेरिस हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असण्याची शक्यता आहे.

 २०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी ’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेली राणी सर्वांनाच खूप भावली होती.   बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरलाच पण त्याचबरोबर राणीच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं.  

टॅग्स :राणी मुखर्जीआदित्य चोप्रा