Join us  

राजीव कपूर आणि रणबीर कपूरचे नाते होते अनोखे, त्यांच्या निधनाने रणबीरला बसलाय धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 6:21 PM

गेल्या वर्षंभरात रणबीर कपूरची आत्या, वडील आणि आता काकांचे निधन झाले. राजीव यांच्या निधनामुळे रणबीर मानसिकरित्या खचला आहे.

ठळक मुद्देरणबीर आणि राजीव यांच्यात खूपच छान नातं होतं. एकावेळेस अशी परिस्थिती होती की, ऋषी कपूर यांच्यापेक्षा देखील राजीव रणबीरला अधिक जवळचे होते.

राजीव कपूर यांचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाले. गेल्या वर्षभरात कपूर कुटुंबावर हा तिसरा मोठा आघात आहे. ऋषी कपूर यांचे निधन एप्रिल महिन्यात झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन महिन्याआधीच त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांचे निधन झाले होते. या दु:खातून कपूर कुटुंब सावरत असतानाच राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली. कपूर कुटुंबावर एकामागोमाग एक संकटं येत आहेत.

गेल्या वर्षंभरात रणबीर कपूरची आत्या, वडील आणि आता काकांचे निधन झाले. राजीव यांच्या निधनामुळे रणबीर मानसिकरित्या खचला आहे. बॉलिवूड हंगामाच्या पत्रकाराशी संवाद साधताना कपूर कुटुंबियांच्या एका जवळच्या व्यक्तीने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रणबीर आणि राजीव यांच्यात खूपच छान नातं होतं. एकावेळेस अशी परिस्थिती होती की, ऋषी कपूर यांच्यापेक्षा देखील राजीव रणबीरला अधिक जवळचे होते.  खरे तर ऋषी कपूर आजारी पडल्यानंतर रणबीर आणि ऋषी अधिक जवळ आले होते. राजीव यांच्यासोबत त्याचे नाते खूपच वेगळे होते. तो प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत असे. राजीव यांच्या निधनाचा रणबीरला चांगलाच धक्का बसला आहे. तो त्यांना खूप मिस करणार यात काहीच शंका नाही.     

रणबीरचे वडील ऋषी कपूर यांचे एप्रिलमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता राजीव यांच्या जाण्याने रणबीर कोलमडला आहे. रणबीरची प्रेयसी आलिया भटसोबत देखील राजीव कपूर यांचे नाते खूपच चांगले होते.  

टॅग्स :रणबीर कपूर