Join us  

येत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 11:37 AM

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कपल लवकरचं लग्नबंधनात अडकणार, असे म्हटले जातेय. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे.

ठळक मुद्दे ‘ब्रह्मास्त्र’ येत्या आॅगस्टमध्ये प्रदर्शित होत आहे त्यापूर्वी या दोघांनी साखरपुडा करावा अशी नीतू यांच्यासह अख्ख्या कपूर कुटुंबीयांची इच्छा आहे. भट्ट कुटुंबाचीही हीच इच्छा आहे. कुटुंबाच्या इच्छेखातर रणबीर आणि आलिया येत्या जूनमध्ये एन्गेज्ड होतील, असे कळत

बॉलिवूडचे सध्याचे सर्वाधिक चर्चित जोडपे कोणते, तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे. गेल्या वर्षभरापासून या कपलच्या रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. आता या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले आहे. तूर्तास चर्चा आहे, ती या कपलच्या लग्नाची. हे कपल लवकरचं लग्नबंधनात अडकणार, असे म्हटले जातेय. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे.

‘फिल्मफेअर’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. सध्या आलिया व रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्ये बिझी आहे आणि ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यापूर्वी दोघेही साखरपुडा करणार, असे मानले जात आहे.  खुद्द रणबीरची आई नीतू कपूर यांची तशी इच्छा आहे. ‘ब्रह्मास्त्र’ येत्या आॅगस्टमध्ये प्रदर्शित होत आहे त्यापूर्वी या दोघांनी साखरपुडा करावा अशी नीतू यांच्यासह अख्ख्या कपूर कुटुंबीयांची इच्छा आहे. भट्ट कुटुंबाचीही हीच इच्छा आहे. कुटुंबाच्या इच्छेखातर रणबीर आणि आलिया येत्या जूनमध्ये एन्गेज्ड होतील, असे कळतेय. 

आलिया व रणबीरचे नाते कपूर कुटुंबाने मान्य केले आहे. हेच कारण आहे की, आलिया अनेकदा कपूर कुटुंबासोबत दिसली आहे. अगदी अलीकडे आलियाने कपूर कुटुंबासोबत न्यू ईअर साजरे केले. याआधीही अनेकदा आलिया रणबीरच्या कुटुंबासोबत दिसली आहे.  

नुकतेच आलियाचे पापा महेश भट्ट यांनी रणबीर व आलिया रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले होते.  द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलले होते. आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात आहे, हे जगजाहिर आहे. हे तुम्हीही समजू शकता. मला रणबीर आवडतो. तो व्यक्ति म्हणून खूप चांगला आहे. आता हे नाते कसे पुढे न्यायचे, हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्या दोघांचा आहे. ते लग्नासारख्या कुठल्या मुक्कामाला पोहोचू इच्छितात की आणखी काही, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. मी यावर बोलणारा, निर्णय देणारा कुणीही नाही. त्यांना आपले नाते पुढे त्यांना पूर्ण अधिकार आहे. आयुष्य आपल्या अटींवरचं जगायचे असते. त्यांचे नाते कुठल्या वळणावर जाते,याची आपण प्रतीक्षा करूया. तूर्तास तरी आपण केवळ प्रतीक्षा करू शकतो, असे महेश भट्ट या मुलाखतीत म्हणाले होते.

 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटनितू सिंगमहेश भट