Join us  

अमिताभ बच्चन यांनी चित्रपट पाहाण्यासाठी बुक केले संपूर्ण चित्रपटगृहच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:16 AM

अमिताभ बच्चन यांनी नुकताच मिशन इन्पॉसिबल हा चित्रपट पाहिला. या चित्रपटासाठी त्यांनी संपूर्ण चित्रपटगृहच बूक केले होते.

चित्रपट पाहायला जाताना तुम्ही कधी संपूर्ण चित्रपटगृहच चित्रपट पाहाण्यासाठी बुक करता का... तर नाही... पण बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने एक चित्रपट पाहाण्यासाठी संपूर्ण चित्रपटगृहच बुक केले. हा अभिनेता दुसरा कोणीही नसून बॉलिवूडचे महानायक  अमिताभ बच्चन आहेत. त्यांनी नुकताच एक चित्रपट पाहाण्यासाठी संपूर्ण चित्रपटगृहच बुक केले होते. त्यांनी ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढून एक चित्रपट पाहिला. अमिताभ बच्चन यांनीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून ही गोष्ट त्यांच्या फॅन्सना सांगितली आहे. 

अमिताभ बच्चन यांनी नुकताच मिशन इन्पॉसिबल हा चित्रपट पाहिला. या चित्रपटासाठी त्यांनी संपूर्ण चित्रपटगृहच बूक केले होते. हा चित्रपट पाहाताना त्यांच्या सोबत रणबीर कपूर देखील होती. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून या फोटोत त्यांच्यासोबत रणबीर दिसत आहे. हा फोटो पाहून या चित्रपटगृहात रणबीर, अमिताभ यांच्यासोबत केवळ एखाद-दुसरी व्यक्ती असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या फोटोसोबत अमिताभ यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. रणबीर आणि मी टॉम क्रूझचा मिशन इन्पॉसिबल हा चित्रपट पाहिला असे त्याने या फोटोसोबत लिहिले आहे. रणबीर कपूरने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत हे त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. रणबीरने शेअर केलेल्या फोटोत अमिताभ आणि रणबीर चित्रपटगृहाच्या आत जाताना आपल्याला दिसत आहेत. बल्गेरिया मध्ये आम्ही चित्रपट पाहिला असे त्याने या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या संपूर्ण टीम बल्गेरिया मध्ये आहे. बल्गेरियामध्ये चित्रीकरणातून वेळ काढून रणबीर, आलिया आणि अमिताभ बच्चन तेथील विविध ठिकाणांना भेटी देखील देत आहेत. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी बल्गेरियामध्ये अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला समोसे आणि वडापावची पार्टी दिली होती. या चित्रपटाची टीम चित्रीकरणासोबत खूप मजा मस्ती करत आहे हेच या फोटोंवरून दिसून येत आहे.  

टॅग्स :अमिताभ बच्चनरणबीर कपूर