Join us  

दुर्गापूजेवेळी ट्रेडिशनल अंदाजात खुलत होते रणबीर-आलिया...पाहा फोटो..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 6:24 AM

आज विजयादशमी म्हणजेच दसरा असला तरी देखील नवरात्रींचा उत्साह अद्याप कमी झालेला नाहीये. तरीही दुर्गापूजेची धूमही पाहायला मिळतेय. याच दुर्गापूजेच्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.

आज विजयादशमी म्हणजेच दसरा असला तरी देखील नवरात्रींचा उत्साह अद्याप कमी झालेला नाहीये. तरीही दुर्गापूजेची धूमही पाहायला मिळतेय. याच दुर्गापूजेच्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढून अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच मुंबईत परतली.काश्मीरच्या रम्य वातावरणातून मुंबईच्या गर्दीत परतलेल्या आलियाने दुर्गापूजेत सहभागी होत देवीची साधना केली. जुहू येथील एका मंडळामध्ये आलिया अभिनेता रणबीर कपूरसोबत गेल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या येण्याने मंडपामध्येही आनंदाचं वातावरण पसरलं होतं. पाहता पाहता गर्दी जमली होती. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा आलिया आणि रणबीरचे फोटो काढण्यासाठी तोबा गर्दी केली.दुर्गा मातेच्या भव्य मूर्तीसमोर नतमस्तक झाल्यानंतर त्या दोघांनीही फोटोसाठी सुद्धा पोझ दिली. यावेळी आलियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर रणबीरही हलक्या गुलाबी रंगाच्या सदऱ्यामध्ये सुरेख दिसत होता. यावेळी त्याने गॉगलही घातलेला दिसत होता. रणबीरने गॉगल घालण्यामागे काही कारण होतं की, ही त्याची नवी स्टाईल स्टेटमेंट, हाच प्रश्न आता सर्वांना पडत आहे.आलिया आणि रणबीरसोबतच दुर्गापूजेच्या या मंडळात अभिनेत्री राणी मुखर्जी, आयान मुखर्जी, भाग्यश्री यांनीही हजेरी लावली होती. दुर्गापुजेच्या दिवसांमध्ये राणी मुखर्जीचा अस्सल बंगाली लूक पाहण्याजोगा असतो. यावेळी सुद्धा ती अशाच मोहक लूकमध्ये देवीच्या दर्शनासाठी आली होती.