Join us  

राखी सावंतला या कारणाने तिच्या वडिलांचा खावा लागायचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 3:58 PM

राखी सावंतच्या आईनेच याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

ठळक मुद्देराखीच्या आईने सांगितले की, राखीने तिच्या मेहनतीने आज नाव कमावले आहे. तिने अनेक संकटं झेलली. पण आमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. मला नेहमीच वाईट वाटते की, मी माझ्या मुलीला चांगले शिक्षण देऊ शकले नाही.

बिग बॉस १४ मध्ये आपल्याला आतापर्यंतच्या सिझनमध्ये दिसलेले काही सेलिब्रेटी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडची कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी सावंत सध्या बिग बॉसच्या चौदाव्या सीझनमध्ये झळकत आहे. पूर्वीच्या सिझनमध्ये राखीमुळे कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. राखी पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये जाऊन हंगामा करत आहे. राखी सावंतची आई सध्या आजारी असून त्यांना पोटाचा कर्करोग झाला आहे. त्यांनी नुकत्याच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राखीला आजवर किती समस्यांना तोंड द्यावे लागले याविषयी सांगितले आहे.

राखीच्या आईने सांगितले की, राखीने तिच्या मेहनतीने आज नाव कमावले आहे. तिने अनेक संकटं झेलली. पण आमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. मला नेहमीच वाईट वाटते की, मी माझ्या मुलीला चांगले शिक्षण देऊ शकले नाही. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आम्ही झोपडपट्टीत राहात होतो. आमची प्रचंड गरीबी होती. त्यामुळे सगळ्या मुलांना शिकवणे आमच्यासाठी शक्य नव्हतं. पण राखीने अतिशय कष्टाने आज पैसा कमावला आहे. ती सगळ्यांचीच काळजी घेते. तिच्या भावांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च देखील तीच उचलते. तसेच भावांच्या लग्नाचा खर्च देखील तिनेच केला आहे. ती आमच्या सगळ्यांसाठी खूप काही करते. राखीला नाचाची आवड लहानपणापासूनच आहे. टेपवर गाणे वाजले की,ती नाचायला लागत असे. आम्ही राहात असलेल्या परिसरात कोणताही समारंभ असेल तर राखी डान्स करत असे. लोक देखील तिच्या नृत्य कौशल्याचे कौतुक करत असत. पण तिचे नाचणे तिच्या वडिलांना आवडत नव्हते. त्यामुळे तिने अनेकवेळा वडिलांचा मार देखील खाल्ला आहे. 

राखी सावंतचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. तिचा नवरा युकेमध्ये राहातो. तो लवकरच बिग बॉसच्या घरात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. राखीचा पती कधीच लोकांच्या समोर आलेला नाहीये. त्यामुळे तो कसा दिसतो हे कोणालच माहीत नाहीये. 

टॅग्स :राखी सावंत