Join us  

चित्रपट, मालिका यांच्यात काम न करता देखील राखी सावंत आहे इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 3:26 PM

राखी चित्रपट, मालिकांमध्ये काम करत नसली तरी ती स्टेज शोद्वारे बक्कळ कमाई करत असल्याचे म्हटले जाते. राखी ही करोडोची मालकीण आहे.

राखी सावंतने १९९७ ला अग्निचक्र या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. तिने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.  शाहरुख खानच्या मैं हूँ ना या चित्रपटात देखील ती झळकली होती. तसेच तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँगस सादर केलेत. राखीने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला असला तरी आयटम गर्ल अशीच तिची ओळख आहे. ती बिग बॉस, ये है जलवा, नच बलिये, अरे दिवानों मुझे पहचानो, राखी का स्वयंवर यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये देखील झळकली आहे. बिग बॉस या कार्यक्रमामुळे तर तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या कार्यक्रमात तिचा अनेक स्पर्धकांसोबत वाद रंगला होता. राखी आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचे जवळचे नाते आहे. सध्या तनुश्री दत्ताच्या प्रकरणामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. राखीने तनुश्रीवर अनेक आरोप केले असून तनुश्रीने देखील या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे.

राखी सावंत गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या चित्रपटात झळकली नाहीये की तिच्याकडे कोणती जाहिरात देखील नाहीये. पण तुम्हाला माहीत आहे का, तरीही राखी सावंत ही करोडोची मालकीण आहे. राखीकडे १५ कोटींहून जास्त पैसा असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. या वेबसाईटच्या बातमीनुसार तिच्याजवळ मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला आहे. याची किंमत जवळजवळ ११ कोटी आहे. तसेच तिच्याकडे २१ लाखाची गाडी आहे. 

राखी चित्रपट, मालिकांमध्ये काम करत नसली तरी ती स्टेज शोद्वारे बक्कळ कमाई करत असल्याचे म्हटले जाते. राखी ही अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिचे वडील मुंबई पोलिस विभागात कॉन्स्टेबल होते तर तिची आई ही गृहिणी होती. राखी सध्या आई आणि भावासोबत मुंबईत राहाते. 

राखीने अभिनयासोबतच राजकारणात देखील आपले भाग्य आजमावले होते. तिने राष्ट्रीय आम पार्टीची स्थापना केली होती आणि या पक्षाद्वारे ती निवडणुकीला देखील उभी राहिली होती. पण तिचा या निवडणुकीत पराभव झाला होता. राखी

टॅग्स :राखी सावंततनुश्री दत्ता