Join us  

राजुकमार राव दिसणार लाइफ इन मेट्रोच्या सिक्वलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 2:45 PM

राजकुमार रावने लाइफ इन मेट्रो हा चित्रपट नुकताच साइन केला असल्याची चर्चा आहे. पण राजकुमार या चित्रपटात कोणत्या भूमिकेत झळकणार याबाबत या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. 

लाइफ इन मेट्रो या चित्रपटाला अनेक वर्षं झाली असली तरी हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या चित्रपटात शिल्पा शेट्टी, शायनी आहुजा, कोंकणा सेन शर्मा, कंगणा राणौत, शर्मन जोशी आणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. तसेच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील सगळीच गाणी त्यावेळी प्रचंड हिट झाली होती. आता या चित्रपटाचा सिक्वल येणार असून बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार या सिक्वलमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

राजकुमार रावने लाइफ इन मेट्रो हा चित्रपट नुकताच साइन केला असल्याची चर्चा आहे. पण राजकुमार या चित्रपटात कोणत्या भूमिकेत झळकणार याबाबत या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. 

अनुराग बासू दिग्दर्शित लाइफ इन अ मेट्रो हा चित्रपट जवळपास अकरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चार शहरांतील चार कथा असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. समीक्षकांनीही चित्रपटाची प्रशंसा केली होती. आता त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासाठी कलाकारांचीही निवड झाली आहे. ‘डीएनए’च्या रिपोर्टनुसार, अनुरागने स्वत: या सिक्वलची पटकथा लिहिली असून त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत निर्मिती होणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यामध्येही वेगवेगळ्या कथा असणार आहेत. 

लाइफ इन अ मेट्रो’मधील गाणीसुद्धा विशेष गाजली होती. त्यामुळे संगीत दिग्दर्शक प्रीतमची साथ सिक्वलसाठीही मिळणार असल्याचे समजते आहे.

राजकुमार राव स्त्री, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, मेंटल है क्या हे राजकुमारचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्याचप्रमाणे त्याने मेड इन चायना हा चित्रपट देखील साइन केला आहे. राजकुमार सध्या त्याच्या कामात चांगलाच व्यग्र असल्याने तो लाइफ इन मेट्रोच्या चित्रीकरणाला केव्हा सुरू करणार याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. 

टॅग्स :राजकुमार राव