Join us  

राजकुमार राव व नुशरत भरुचा 'ह्या' सिनेमासाठी आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 6:22 PM

राजकुमार राव व नुशरत भरूचाने 'लव्ह सेक्स और धोखा' या सिनेमातून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

ठळक मुद्दे'तुर्रम खान'ची कथा उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्या गावातली'तुर्रम खान' हा कॉमेडी चित्रपट राजकुमार राव व नुशरत भरुचा दुसऱ्यांदा करणार एकत्र काम

अभिनेता राजकुमार रावने बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपले स्थान निर्माण केले आहे. विविध भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. नुकताच त्याचा 'स्त्री' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो असून यातील या दोघांचा अभिनयही प्रेक्षकांना खूप भावला आहे. आता राजकुमार राव दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपट 'तुर्रम खान'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात अभिनेत्री नुशरत भरुचा राजकुमारसोबत एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

'तुर्रम खान' या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशमधल्या एका छोट्या गावातली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. हा कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाचे निर्माते अजय देवगण, लव रंजन आणि अंकुर गर्ग आहेत. या चित्रपटाबाबत हसंल मेहता यांनी इंस्टाग्रामवर त्या तिघांचा फोटो शेअर करून सांगितले आहे.

राजकुमार राव याविषयी म्हणाला, 'माझे करियर उभे करण्यामागे हंसल मेहता यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि नुशरतला मी माझ्या स्ट्रगलिंगच्या काळापासून ओखळतो. ऑडीशन आणि स्क्रीन टेस्टसाठी बऱ्याचदा आम्ही भेटायचो. त्यामुळे आमची ही जोडी प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल असा मला विश्वास आहे.'राजकुमार आणि हंसल मेहता यांचा हा पाचवा चित्रपट असेल. याआधी 'शाहिद', 'अलिगढ', 'सिटीलाइट्स' आणि 'ओमर्टा' या चार चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केले आहे. विशेष म्हणजे 'लव्ह सेक्स और धोखा' या चित्रपटातून राजकुमार आणि नुशरतने एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. लव रंजनच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये नुशरतने भूमिका साकारली असून त्या भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता राजकुमार- नुशरतची ही नवी जोडी पडद्यावर काय धमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :राजकुमार रावअजय देवगण