Join us

​रजनीकांत यांच्या पत्नी लता अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाने दिलेत ६.२ कोटी रूपये परत करण्याचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 14:54 IST

मेगास्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने लता यांना दोन आठवड्याच्या आत एका जाहिरात ...

मेगास्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने लता यांना दोन आठवड्याच्या आत एका जाहिरात कंपनीला ६.२ कोटी रूपये परत करण्याचे आदेश दिले आहेत.   अ‍ॅड ब्युरो अ‍ॅडवर्टायजिंग प्राय. लिमिटेड या जाहिरात कंपनीने लता यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  हे प्रकरण ‘कोचाडियन’ चित्रपटाच्या हक्क विक्रीशी संबंधित आहे.   लता यांनी आमच्या कंपनीकडून १० कोटी रूपये घेतले. पण चित्रपटाचे  हक्क दुसºयाच कंपनीला विकले, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. शिवाय लता यांनी कोर्टात खोटी कागदपत्रं सादर केल्याचा आरोपही याचिकाकर्त्या कंपनीने केला होता.   ‘कोचाडियन’ या चित्रपटात दीपिका पादुकोण लीड रोलमध्ये होती. या चित्रपटात रजनीकांत यांच्या पत्नी लता यांनी एक गाणेही गायले होते. रजनीकांत व लता यांची मुलगी सौंदर्या हिने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यात रजनीकांत एका ऐतिहासिक भूमिकेत दिसले होते. यात त्यांचा डबलरोल होता. दीपिकाशिवाय जॅकी श्रॉफ आणि दाक्षिणात्य स्टार सरथ कुमार यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्साठी ‘कटिंग एज फोटोरिअलिस्टिक परफॉरमन्स कॅप्चर टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आला होता. या चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता. अर्थात याऊपरही बॉक्सआॅफिसवर चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळू शकले नव्हते. परिणामी मेकर्सला मोठे नुकसान सोसावे लागले होते.ALSO READ : रजनीकांतबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत?लवकरच रजनीकांत यांचा ‘2.0’ हा मेगाबजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आत्तापर्यंत दोनदा या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अक्षय कुमार व एमी जॅक्सन यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.