Join us  

रजनीकांत लखनऊमध्ये करताहेत या सिनेमाचे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 3:01 PM

अभिनेते रजनीकांत आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लखनऊला पोहचले आहेत. ते पहिल्यांदाच लखनऊला गेले असून ते एक महिना तिथे राहणार आहेत.

ठळक मुद्देरजनीकांत यांनी लखनऊमध्ये 'थलाइवा १६५'च्या चित्रीकरणाला सुरूवात'थलाइवा १६५' चित्रपटाचा बजेट ३०० कोटींचा'थलाइवा १६५' चित्रपटात रजनीकांतसोबत दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी

दाक्षिणात्य सुपरस्टार व थलाइवा या नावाने लोकप्रिय असलेले अभिनेते रजनीकांत आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लखनऊला पोहचले आहेत. ते पहिल्यांदाच लखनऊला गेले असून ते एक महिना तिथे राहणार आहेत. त्यांच्या सिनेमाचे तात्पुरते नाव 'थलाइवा १६५' असे असून या चित्रपटाची निर्मिती सन टीव्ही प्रोडक्शन अंतर्गत होते आहे. तर दिग्दर्शन कार्तिक सुब्बराज करत आहेत.

रजनीकांत यांनी लखनऊमध्ये 'थलाइवा १६५' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. या चित्रपटाचा बजेट ३०० कोटींच्या जवळपास असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. लखनऊमध्ये चित्रीत होणारा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. यात रजनीकांत यांच्याव्यतिरिक्त विजय सेतुपती आणि नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार अाहेत. लखनऊसह या सिनेमाचे बनारस, सोनभद्रमध्ये चित्रीकरण पार पडणार आहे. यात उत्तर प्रदेशमधील ४३ कलाकारांना घेण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात नवाज कोळसा तस्करी करणाऱ्या सिंगाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमातील काही दृश्य सोनभद्र येथे चित्रीत केले जाणार आहेत. तिथे रजनीकांत व नवाज यांच्यात लढाईचे सीन चित्रीत केले जाणार आहेत. या चित्रपटाचे लाइन प्रोड्युसर इक्बाल जाफरी व जफर खान यांनी सांगितले की चित्रपटाचे शूटिंग जवळपास दिड महिन्यापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. इथल्या हजारों लोकांना या चित्रपटात काम करण्यासाठी घेतले असून ते छोट्या मोठ्या भूमिकेत दिसणार आहेत. तर काही गर्दीत दिसणार आहेत.'थलाइवा १६५' चित्रपटाची कथा अद्याप समजू शकलेली नाही. मात्र या सिनेमात रजनीकांत व नवाजुद्दीन सारखे दिग्गज कलाकार आहेत, हे समजल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आणखीन वाढली आहे. 

टॅग्स :रजनीकांतनवाझुद्दीन सिद्दीकी