Join us  

राहुल देव करणार भोजपुरी सिनेमा; अशी आहे भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 2:28 PM

‘बिग बॉस10’ मध्ये दिसलेला अभिनेता राहुल देव आता भोजपुरी चित्रपटांकडे वळला आहे. 

‘बिग बॉस10’ मध्ये दिसलेला अभिनेता राहुल देव आता भोजपुरी चित्रपटांकडे वळला आहे. होय, ‘दुल्हन चाही पाकिस्तान से2’ या चित्रपटातून राहुल देव भोजपुरी इंडस्ट्रीत डेब्यू करतोय. या चित्रपटात राहुल देव खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.निर्माता दिग्दर्शक राजकुमार आर पांडे यांच्या होम प्रॉडक्शनच्या या चित्रपटात प्रदीप पांडे उर्फ चिंटू मुख्य भूमिकेत आहे तर राहुल देव एका पाकिस्तानीची भूमिका साकारतो आहे. जो चिंटूच्या प्रेमकथेतील विलेन असेल. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट ठरलेली नाही.राहुल देवने अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. पण यापैकी बहुतेक चित्रपटांत त्याने खलनायकचं रंगवला. हिंदीशिवाय कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि बंगाली चित्रपटातही तो दिसला. अनेक टीव्ही शोमध्येही तो सहभागी झाला. ‘बिग बॉस’च्या दहाव्या सीझनमध्ये राहुल देव स्पर्धक बनून ‘बिग बॉस’च्या घरात गेला होता. या घरातील त्याचा प्रवास प्रेक्षकांना चांगलाचं भावला होता. सलमान खानसोबत ‘दस’ आणि ‘क्योंकी’ या चित्रपटात राहुलने काम केले आहे. आता हाच राहुल भोजपुरी सिनेमाही गाजवणार आहे.प्रोफेशनल लाईफसोबतच राहुल देव त्याच्या लव्हलाईफबद्दलही चर्चेत असतो. तुम्हाला ठाऊक आहेच की, राहुल व अभिनेत्री मुग्धा गोडसे हे दोघेही लिव्हइनमध्ये राहत आहेत. दोघांच्याही वयात १८ वर्षांचा फरक आहे. राहुल ४८ वर्षांचा आहे तर मुग्धा ३१ वर्षांची. १९९८ मध्ये राहुलने रीना देवशी लग्न केले होते. या दोघांचा २० वर्षांचा सिद्धांत नावाचा एक मुलगाही आहे. २००९ मध्ये कॅन्सरमुळे रीनाचा मृत्यू झाला. यानंतर राहुलने दुसरे लग्न केले नाही. पण तो मुग्धामध्ये गुंतला. मुग्धा गोडसे सध्या बॉलिवूडमध्ये फार सक्रिय दिसत नाही. तिच्याबद्दल सांगायचे तर ती मिस इंडिया 2004 ची सेमी फायनलिस्ट राहून चुकली आहे. मुग्धाने २००८ मध्ये मधुर भंडारकरच्या  ‘फॅशन’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. यांनतर तिने आॅल द बेस्ट. हेल्प, जेल, हिरोईन असे अनेक चित्रपट केलेत.

 

टॅग्स :राहुल देव