Join us

​रहमानचे ‘ऐतिहासिक’ लव्ह साँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 11:41 IST

चेन्नईचा ‘मोझार्ट’ ए. आर. रहमानने आशुतोष गोवारीकरच्या महत्त्वकांक्षी ‘मोहेंजदडो’ चित्रपटाला आपल्या अवीट संगीताने सजवले आहे.न केवळ एतिहासिक तर ...

चेन्नईचा ‘मोझार्ट’ ए. आर. रहमानने आशुतोष गोवारीकरच्या महत्त्वकांक्षी ‘मोहेंजदडो’ चित्रपटाला आपल्या अवीट संगीताने सजवले आहे.न केवळ एतिहासिक तर पूर्व इतिहासकालीन काळात घडणारी प्रेमक था या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात रहमानने स्वत: एक रोमॅण्टिक गाणे गायिले असून ते जुलैमध्ये ते रिलीज करण्यात येणार आहे.आशुतोष म्हणतो, इतिहासकार, पुरातत्त्वतज्ञ यांच्याशी चर्चा, संशोधन करून आम्ही प्राचीन सभ्यता कशी असेल याचा विचार केला. यामध्ये ए. आर. रहमान यांच्या संगीताचे फार मोठे योगदान राहिले. तो काळ अधिक भव्य, सुंदर आणि विश्वसनीय पद्धतीने उभा करण्यात त्यांच्या संगीताची महत्त्वाची भूमिका आहे.‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा-अकबर’ या आशुतोषच्या चित्रपटांना रहमान यांनी पूर्वी संगीत दिलेले आहे. त्यामुळे यंदा दोघे रसिकांसाठी काय सरप्राईज आणतात हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.