Join us  

राधिका आपटेने स्वत:च्या लग्नात नेसली होती फाटलेली साडी, फॉरेनरसोबत गुपचूप केला होता विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 1:16 PM

आज राधिका आपटे ३६वा वाढदिवस साजरा करते आहे.

अभिनेत्री राधिका आपटे बॉलिवूडमध्ये बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. राधिकाने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आज राधिका आपटे ३६वा वाढदिवस साजरा करते आहे. राधिका आपटेने फॉरेनरसोबत लग्न केल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. 

राधिका आपटेचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ रोजी पुण्यात झाला आहे. राधिका कथ्थकचे धडे गिरवत असताना तिला एका कास्टिंग डायरेक्टरने पाहिले आणि चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. राधिका २००५ मध्ये शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव सोबत 'वाह लाइफ हो तो ऐसी' चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती, पण त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर तिने बंगाली आणि मराठी चित्रपटात काम केले. 'रक्त चरित्र', 'रक्त चरित्र 2', 'शोर इन द सिटी', 'बदलापूर', आणि 'हंटर' या चित्रपटात ती दिसली आहे. 'मांझी' चित्रपटात तिने साकारलेल्या 'फागुनिया'चे खूप कौतुक झाले.

राधिका आपटेच्या लग्नाबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.तिने २०१२ साली फॉरेनर संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी गुपचूप लग्न केले आहे. राधिकाने एक वर्षे ही गोष्ट लपवून ठेवली होती. राधिका आणि बेनेडिक्ट २०११ साली भेटले, जेव्हा लंडनला ती नृत्य शिकण्यासाठी गेली होती.

राधिकाने स्वःताच्याच लग्नात फाटलेली जुनी साडी नेसली होती. एका मुलाखतीत राधिकाने सांगितले होते की, 'माझे रजिस्टर लग्न होते, या दिवशी मी माझ्या आजीची जुनी साडी नेसली होती. या साडीला अनेक छिद्रे होती. पण तरीही मी तीच साडी नेसण्याचा निर्णय घेतला. कारण मी माझ्या आजीच्या खूप जवळ होते, ती माझी आवडती व्यक्ती आहे. माझ्या लग्नावर फक्त कपड्यांवर भरपूर पैसा खर्च करणाऱ्यांपैकी मी नाही. 

राधिकाने सांगितले की यानंतर तिने पूर्ण रीतीरिवाजाने लग्न केले, ज्यासाठी तिने एक नवीन पोशाख खरेदी केले होते. कारण तिला त्या दिवशी चांगले दिसायचे होते.

टॅग्स :राधिका आपटे