Join us  

Radhe Shyam Trailer Out: क्या प्यार किस्मत से लढकर जीत सकता है...? पाहा,‘राधे श्याम’चा जबदस्त ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 4:01 PM

Radhe Shyam Trailer Out: या ट्रेलरमध्ये काय नाही? इमोशन्स, लव्ह,रोमान्स, ट्रॅजेडी... पाहून तुम्हीही म्हणाल, एकदम जबरदस्त

Radhe Shyam Trailer Out: साऊथचा सुपरस्टार प्रभास  (Prabhas) आणि बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde)  यांच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटाची आधीच जोरदार चर्चा होती. आता काय तर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाये आणि तो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  रिलीज होताच या ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलरमधील प्रभास व पूजाची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.ट्रेलरची सुरूवातच लव्हस्टोरीने होते आणि अंत काहीसा दु:खद... होय, ट्रेलरचा शेवट पाहून ‘टायटॅनिक’ची आठवण होते.

ट्रेलरमध्ये प्रभास विक्रमादित्यचं पात्र साकारताना दिसतोय. सून, अगली बार माँ पुछेगी तो कह देना, मेरी किस्मत में प्यार, शादी दोनों नहीं है.., या वाक्याने ट्रेलरची सुरूवात होते.  विक्रमादित्यला पूजा आवडत तर असते पण त्याचा प्रेमावर विश्वास नसतो. तो फक्त फ्लर्ट करत असल्याचं बोलतो. पण नंतर त्यांच्यात ‘दोन जिस्म, एक जान’असं प्रेम होतं. तुझ्याशी भेटल्यानंतर माझा चमत्कारावर विश्वास बसू लागला आहे, असं विक्रम म्हणतो. यादरम्यान पूजा व प्रभासची केमिस्ट्री पाहतांना नजर हटतं नाही. पण शेवटी या प्रेमाचा अंत कदाचित दु:खद होतो. एक जहाज पाण्यात बुडताना दिसतं. हे जहाज पाहून टायटॅनिक सिनेमाची आठवण हटकून होते.

‘राधेश्याम’ ही युरोपमधील एक महाकाव्य प्रेमकथा असल्याचं मानलं जातंय.  या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या 14 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :प्रभासपूजा हेगडे