Join us  

इटलीतील 'राधे श्याम'चे शेड्यूल संपल्यानंतर पूजा हेगडे प्रभाससोबत सुरु करणार हैदराबादमध्ये शूटिंग?

By गीतांजली | Published: November 04, 2020 4:39 PM

इटलीवरून पूजा तिचे शूट संपवून परत आली आहे.

अभिनेत्री पूजा हेगडे  'राधे श्याम' चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर इटलीहून मायदेशी परतली आहे.पूजासह या चित्रपटात तेलगू चित्रपटांतील सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहेत. तिच्यासोबत ती हैदराबादमध्ये चित्रपटाच्या अंतिम शेड्यूलचे शूटिंग करणार आहे.

ऑक्टोबर सुरुवातीस पूजा 'राधे श्याम' हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी देशातून इटलीला रवाना झाली होती. 13 ऑक्टोबर रोजी पूजाने आपला वाढदिवस चित्रपटाच्या सेटवरच साजरा केला.  दरम्यान, 'राधे श्याम' चित्रपटाच्या निर्मात्यांनी पूजाच्या पहिल्या लूकचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यात पूजाच्या चाहत्यांना तीची पहिली झलक पाहायला मिळाली.

 इटलीवरून पूजा तिचे शूट संपवून  परत आली आहे पण लवकरच ती हैदराबादला जाऊन  प्रभाससोबत ह्या चित्रपटाचे उर्वरित शूट पूर्ण करणार आहे. यासाठी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये एक खास सेट तयार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी  निर्मात्यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील प्रसिद्ध केले ज्याला सोशल मीडियावरील चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित ‘राधे श्याम’ हा चित्रपट हा बिग बजेट ड्रामा, रोमँटिक चित्रपट आहे, ज्यामध्ये पूजा हेगडे आणि प्रभास यांच्याशिवाय भाग्यश्री, प्रियदर्शी, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर इत्यादी मुख्य भूमिकेत आहेत.  

टॅग्स :पूजा हेगडेप्रभास