Join us  

​‘क्वांटिको3’चे न्यूयॉर्कमधील शूटींग संपले! प्रियांका चोप्राने असा साजरा केला शेवटचा दिवस!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 10:14 AM

प्रियांका चोप्रा दीर्घकाळापासून न्यूयॉर्कमध्ये आहे. येथे पीसी ‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही सीरिजच्या तिस-या सीझनमध्ये बिझी आहे. पण आता न्यूयॉर्कमधील ...

प्रियांका चोप्रा दीर्घकाळापासून न्यूयॉर्कमध्ये आहे. येथे पीसी ‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही सीरिजच्या तिस-या सीझनमध्ये बिझी आहे. पण आता न्यूयॉर्कमधील ‘क्वांटिको3’चे शूटींग शेड्यूल संपले आहे. होय, अलीकडे प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये ‘क्वांटिको3’ची रॅपअप पार्टी साजरी केली.  या सेलिब्रेशनचे काही फोटो तिने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पीसी ‘क्वांटिको3’च्या कू्रसोबत दिसते आहे. या पार्टीचा एक व्हिडिओही सध्या वेगाने व्हायरल होतो आहे.  न्यूयॉर्कमधील शेड्यूल संपल्यानंतर आता  Ireland येथे ‘क्वांटिको3’च्या काही भागांचे शूट होणार आहे. न्यूयॉर्कनंतर  ‘क्वांटिको3’ टीम याठिकाणी रवाना होतेय. याठिकाणी ‘क्वांटिको3’चे शेवटचे काही एपिसोड शूट केले जातील.‘क्वांटिको3’च्या रॅपअपसोबतच प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये स्नो फॉलही एन्जॉय केला. स्टायलिश कोट आणि ब्लॅक आऊटफिट घालून ती न्यूयॉर्कच्या रस्त्यावर स्रो फॉलचा आनंद घेतेय.‘क्वांटिको3’ पूर्ण झाल्यानंतर प्रियांका भारतात परतते की, हॉलिवूडच्या नव्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये बिझी होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चर्चा खरी मानाल तर प्रियांकाने दोन हॉलिवूड चित्रपट साईन केले आहेत. यातील एक अ‍ॅक्शनपट आहे आणि एक रोमॅन्टिक़ अर्थात अद्याप प्रियांकाने याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.मध्यंतरी प्रियांका ‘ऐतराज’च्या सीक्वलमधून बॉलिवूडमध्ये परतणार अशी बातमी होती.१४ वर्षांपूर्वी आलेल्या सुभाष घई निर्मित ‘ऐतराज’या थ्रीलर चित्रपटाला अब्बास मस्तान यांनी दिग्दर्शित केले होते. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, गत दोन वर्षांपासून घई यांनी या चित्रपटाच्या सीक्वलवर काम सुरू केले होते. गत महिन्यात या सीक्वलची स्क्रिप्ट पूर्ण झाली. या सीक्वलमध्ये प्रियांका चोप्राने काम करावे, अशी घई यांनी इच्छा आहे. आपली ही इच्छा त्यांनी प्रियांकाला बोलून दाखवली. सूत्रांचे मानाल तर प्रियांकालाही ही स्क्रिप्ट ऐकताक्षणीच आवडली े. या सीक्वलमध्ये एक नवी कथा  असेल. न्यूयॉर्कमधून प्रियांका परतल्यावर घई तिच्याशी एक फायनल मीटिंग करतील.