Join us  

Priyanka Nick Wedding : भर मंडपात प्रियांका झाली भावूक, डोळ्यांत दाटले अश्रू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 11:19 AM

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अखेर काल २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह बंधनात अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनासोबत तिने लग्नगाठ बांधली.  १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने तर  २ डिसेंबरला प्रियांकाने  हिंदू पद्धतीने लग्न केले.

ठळक मुद्देप्रियांकाच्या डोळ्यांत अश्रू बघून निकने तिला लगेच सांभाळले आणि ‘देसी गर्ल’च्या ओठांवर पुन्हा हसू उमलले.

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अखेर काल २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह बंधनात अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनासोबत तिने लग्नगाठ बांधली.  १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने तर  २ डिसेंबरला प्रियांकाने  हिंदू पद्धतीने लग्न केले.  अगदी जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थित पार पडलेल्या या विवाहसोहळ्याने सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले. या लग्नाचा एकही फोटो अद्याप बाहेर आलेला नाही. पण लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकच्या गळ्यात वरमाला घालताना  प्रियांका कमालीची भावूक झाली होती. यावेळी तिच्या डोळ्यांत अश्रू आलेत. प्रियांकाच्या डोळ्यांत अश्रू बघून निकने तिला लगेच सांभाळले आणि ‘देसी गर्ल’च्या ओठांवर पुन्हा हसू उमलले.

रात्री उशीरा प्रियांका आपल्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करेल, असा अंदाज होता. पण अद्याप प्रियांकाने लग्नाचा एकही फोटो शेअर केलेला नाही. काल रात्री ७.३० च्या सुमारास प्रियांकाच्या लग्नाचे विधी सुरु झालेत. जोधपूरमधल्या आलिशान उमेद भवन येथे निक आणि प्रियांकाचे लग्न व्हावे,अशी प्रियांकाच्या आईची इच्छा होती. या इच्छेचा मान ठेवत प्रियांकाने उमेद भवनमध्ये दोन्ही परंपरांच्या पद्धतीने निकसोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे आता प्रियांका अधिकृतपणे जोनास कुटुंबाची सून झाली आहे.  प्रियांकाच्या वडीलांचे २०१३ मध्ये निधन झाल्यामुळे तिचे कन्यादान कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अभिनेत्री परिणिती चोप्राचे वडील पवन चोप्रा आणि त्यांची पत्नी रीना यांनी प्रियांकाचे कन्यादान केले.  लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत.  निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली. यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा ‘रोका’ झाला होता. 

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास