Join us  

Priyanka Nick Wedding: दीपवीरप्रमाणे निकयांकाही चाहत्यांना करवणार दीर्घ प्रतीक्षा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 10:36 AM

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते कधी नव्हे इतके आतूर झाले होते. पण दीपवीरने लग्नाचा एकही फोटो लीक होऊ दिला नाही. आता प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नातही हाच कित्ता गिरवला जाणार आहे.

ठळक मुद्देदीपिका व रणवीरप्रमाणेचं प्रियांका व निक हेही आपल्या लग्नाचे फोटो स्वत:च शेअर करतील. अर्थात दोघांनी लग्नाच्या फोटोचे हक्क एका इंटरनॅशनल मॅगझिनला विकले, त्यामुळे सर्वप्रथम या मॅगझिनमध्येचं निकयांकाच्या लग्नाचे फोटो झळकतील,अशी ही चर्चा आहे. 

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते कधी नव्हे इतके आतूर झाले होते. पण दीपवीरने लग्नाचा एकही फोटो लीक होऊ दिला नाही. लग्नातील वºहाड्यांना मोबाईल फोन बॅन करण्यापासून तर कडेकोट सुरक्षा ठेवण्यापर्यंत दीपवीरने सगळे काही केले. त्यासाठी अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला. आता प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नातही हाच कित्ता गिरवला जाणार आहे. होय, प्रियांका व निकच्या लग्नापूर्वी जोधपूरच्या उमेद भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांनाही एकही फोटो काढण्याची परवानगी नाही. प्राप्त माहितीनुसार, उमेद भवनाच्या सगळ्या स्टाफला सुट्टी देण्यात आली आहे. त्यांच्याजागी प्रियांका व निकने नवा स्टाफ हायर केला आहे. इव्हेंट मॅनेजमेंंट कंपनीलाही एकही फोटो काढण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कर्मचाºयांचे स्मार्ट फोन काढून त्यांना आपआपसात बोलण्यासाठी त्यांना बेसिक फोन दिले गेले आहेत.

येत्या २ डिसेंबरला प्रियांका व निकचे शुभमंगल आहे. प्रियांकाच्या लग्नाला काही इंटरनॅशनल स्टार हजेरी लावणार असल्याचीही खबर आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेचं उपस्थित राहणार आहेत. सुमारे ८० लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास