प्रियांका चोप्राच्या ‘स्कार्फ’वरून झाला ‘हंगामा’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:06 IST
गत १५ आॅगस्टला संपूर्ण देशभर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. सेलिब्रिटींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्यात. पण प्रियांका चोप्राने दिलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडिया युजर्सला फार काही रूचल्या नाहीत.
प्रियांका चोप्राच्या ‘स्कार्फ’वरून झाला ‘हंगामा’!!
गत १५ आॅगस्टला संपूर्ण देशभर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. सेलिब्रिटींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्यात. पण प्रियांका चोप्राने दिलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडिया युजर्सला फार काही रूचल्या नाहीत. प्रियांकाने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती व्हाईट स्पॅगिटी, जीन्स आणि गळ्यात तिरंगा स्कार्फ अशा वेषात आहे. केशरी, पांढरा व हिरवा अशा तिरंग्याचे रंग असलेला तिचा हा दुपट्टाच अनेकांना खटकला आहे. आपल्या देशाप्रती असलेल्या भावना तिने #Vibes #MyHeartBelongsToIndia #happyindependencedayindia #jaihind या हॅशटॅग्समधून व्यक्त केल्या. पण तिने हा व्हिडिओ शेअर करताच त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्यात. प्रियांकाने भारतीय ध्वजाचा अपमान केला आहे, असे काही नेटिजन्सने लिहिले. ‘तिरंग्याला नमन करायला शिक, त्यासोबत खेळू नको,’ असे एका युजरने लिहिला. एका युजरने तर प्रियांकाचे चांगलेच कान टोचले. ‘हा भारतीय ध्वज आहे, तुझा ड्रेस नाही,’ अशी बोचरी कमेंट त्याने केली. अलीकडे बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही प्रियांकाच्या मनस्तापाचे (?)कारण ठरली होती. या भेटीदरम्यान प्रियांकाने घातलेला तोकडा ड्रेस वादाचा विषय ठरला होता. यावरून प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. काही महिन्यांपूर्वी प्रियांका तिच्या हॉलिवूड फिल्मच्या प्रमोशनसाठी बर्लिनला गेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिन येथे असल्याचे कळल्यावर प्रियांकाने त्यांची तेथे भेट घेतली होती. ‘अविस्मरणीय क्षण’, असे या भेटीचे वर्णन करत प्रियांकाने मोदींबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रियांकाच्या मोदींसोबतच्या या फोटोला हजारो लाईक्स मिळाले होते. पण तेवढाच हा फोटो अनेकांना खटकलाही होता. देशाच्या पंतप्रधानांना भेटताना प्रियांकाने असा शॉर्ट ड्रेस घालायला नको होता, असा सल्ला अनेकांनी यानंतर प्रियांकाला दिला होता. यावरून मग प्रियांका सोशल मीडियावर बरीच ट्रोल झाली होती.