Join us  

हे आहेत प्रियंकाच्या सौंदर्याचे सिक्रेट्स, तिच्यासारखे सौंदर्य मिळवण्यासाठी करा या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 5:00 PM

प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट करत घरी राहून ती तिच्या केसांची आणि त्वचेची काळजी कशी घेत आहे याविषयी सांगितले आहे.

ठळक मुद्देघरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून फेस पॅक आणि फेस मास्क कसा बनवता येईल याविषयी देखील प्रियंकाने तिच्या फॅन्सना माहिती दिली आहे. 

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. सध्या भारतातील सगळे पार्लर बंद असल्याने सामान्य लोकांनाच नव्हे तर सेलिब्रेटींना देखील घरगुती उपाय करून आपल्या शरीराची काळजी घ्यावी लागत आहे. 

सगळ्याच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही लॉकडाऊनमुळे थांबवण्यात आले आहे. त्यामुळे सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट करत घरी राहून ती तिच्या केसांची आणि त्वचेची काळजी कशी घेत आहे याविषयी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून फेस पॅक आणि फेस मास्क कसा बनवता येईल याविषयी देखील तिने तिच्या फॅन्सना माहिती दिली आहे. 

प्रियंकाने या व्हिडिओसोबत एक पोस्ट लिहिली आहे आणि त्यात म्हटले आहे की, केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय कशाप्रकारे करायचे हे माझ्या आईने मला शिकवले आहे. माझ्या आईला तिच्या आईने म्हणजेच माझ्या आजीने शिकवले होते. दह्यात एक चमचा मध, एक अंड मिक्स करून घ्या आणि तुमच्या केसांना हा पॅक तीस मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवून घ्या. या पॅकचा माझ्या केसावर खूप चांगला परिणाम होतो. पण याचा वास खूपच विचित्र येतो. त्यामुळे हा पॅक लावल्यानंतर दोनदा तरी शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत आणि कंडिशनचा देखील वापर करावा...    

टॅग्स :प्रियंका चोप्रा