Join us  

​प्रियांका चोप्रा करणार लहान मुलासाठी चित्रपटांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2017 1:22 PM

अभिनेत्री प्रियांका चोप्राने अभिनयक्षेत्रात लौकीक मिळविल्यावर निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. भोजपुरी मराठी व पंजाबी भाषेतील चित्रपटांची निर्मिती केल्यावर ...

अभिनेत्री प्रियांका चोप्राने अभिनयक्षेत्रात लौकीक मिळविल्यावर निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. भोजपुरी मराठी व पंजाबी भाषेतील चित्रपटांची निर्मिती केल्यावर प्रियांकाने आता लहान मुलांचे मनोरंजन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्सच्या (पीपीपी)बॅनरखाली सिक्किम, कोंकणी आणि हिंदी  भाषेत लहान मुलांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करणार आहे. मुख्यधारेतील चित्रपटात लहान मुलांच्या चित्रपटांचा सहभाग फारच कमी असल्याने ही कमतरता दूर करण्यासाठी प्रियांका प्रियत्न करीत आहे असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राच्या निर्मितीमध्ये कथालेखक व दिग्दर्शक या महिला असतील. आपल्या या नव्या उपक्रमाची माहिती देताना प्रियांका म्हणाली, आतापर्यंत लहान मुलांवर फारच कमी चित्रपटांची निर्मिती करण्यात आहे. आम्ही ‘पीपीपी’च्या माध्यमातून या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहोत. लहान  मुलांच्या विश्वात निरागसता, प्रेम व साधेपणा पहायला मिळतो. या शैलीचा चित्रपट निर्माण करण्याचा विचाराने मी उत्साहित झाली आहे. मला याचा आनंद आहे की, आम्ही लहान मुलांसाठी चित्रपटांची निर्मिती करणार आहोत. आपला देश अद्भूत कथांचा खजीना आहे, या कथा आपण लहानपणापासून एैकत आलो आहोत. प्रांतिक भाषांतही लहान मुलांच्या भरमसाठ कथा आहेत. या कथा आपल्या आठवणींचा एक भाग आहे. आम्ही जे चित्रपट निर्माण करणार आहोत ते सर्व चित्रपट मुलांचे विश्वातील असतील व लहान मुलांना आवडतील असे असतील. ‘पीपीपी’च्या माध्यमातून निर्मित केले जाणारे सर्व तिनही चित्रपट महिला लेखिका, महिला दिग्दर्शक व महिला निर्मात्याद्वारे तयार करण्यात येणार आहेत. याबाबत प्रियांका म्हणाली, प्रतिभाशाली महिलांसोबत काम करण्याचा अनुभव मला अधिक समृद्ध करणारा ठरला आहे. त्यांचा अंदाज मोहणी घालणारा ठरतो. ते आपल्या विश्वात घेऊन जातात. अशा महिलांसोबत मी काम करण्यास उत्सुक आहे. ‘पीपीपी’बॅनरखाली २०१७ साली पाखी टायरवाला लिखित व दिग्दर्शित सिक्कीमी चित्रपट पहुना, सुर्वणा नसनोडकर लिखित व दिग्दर्शित कोकंणी व हिंदी चित्रपट लिटील जो, कहा हो व लॉरा मिश्राचा अलमसर हा हिंदी हे चित्रपट रिलीज केले जाणार आहेत. दरम्यान सिक्कीम सरकारने पहुनाच्या निर्मितीमध्ये आपला सहभागा दर्शविल्याने प्रियांका सध्या चांगलीच खूश आहे.