Join us

स्त्री-पुरुष समानतेवर विचारलेल्या खोचक प्रश्नाचे प्रियंका चोपडाने दिले खणखणीत उत्तर, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 16:29 IST

देसी गर्ल प्रियंका चोपडा नुकतीच दुबई येथे एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला स्त्री-पुरुष समानतेवर एक प्रश्न विचारला असता तिने खणखणीत उत्तर दिले.

देसी गर्ल प्रियंका चोपडा तिच्या अमेरिकन टीव्ही सिरीज ‘क्वांटिको-३’ची शूटिंग पूर्ण करून भारतात परतली आहे. मात्र भारतात येण्याअगोदर ती दुबईमध्ये आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. याठिकाणी प्रियंकाने ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्किल फॉरम (जीईएसएफ) २०१८ मध्ये भाग घेतला व लैंगिक समानतेवर आपले मतही मांडले. मात्र या इव्हेंटदरम्यान, प्रियंकाने एका प्रश्नांचे ज्या अंदाजात उत्तर दिले, तिचा तो अंदाज सोशल मीडियावर चांगलाच सुपरहिट ठरत आहे. महिलावाद आणि लैंगिक समानतेबद्दल विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे प्रियंकाने जबरदस्त अंदाजात उत्तरे दिले, सध्या तिचा याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या इव्हेंटदरम्यान प्रियंकाला एका व्यक्तीने विचारले की, तू पुरुषांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल का बोलत नाहीस? त्यावेळी तुझे फॅमेनिझम कुठे जाते? या व्यक्तीने विचारले की, जर एखादा मुलगा एखाद्या मुलीची छेड काढत असेल अन् ती मुलगी त्याच्या कानशिलात मारत असेल तर त्या पुरुषाप्रती हा गुन्हा नाही काय? हा प्रश्न ऐकताच प्रियंकाच्या चेहºयावर हसू फुलले. प्रियंकाने उत्तर देताना म्हटले की, तुम्ही असे म्हणत आहात की जर एखादा मुलगा मुलीची छेड काढत असेल तर तिने त्याच्या कानशिलात मारायला नको? तसे केल्यास त्या मुलावर अन्याय होईल?प्रियंका बोलत असतानाच त्या व्यक्तीने स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा समोर केला. प्रियंकाने उत्तर देताना म्हटले की, शारीरिक विचार केल्यास महिला आणि पुरुष एकमेकांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळे आहेत. आम्ही म्हणत आहोत की, आम्हाला नोकºया द्या, आम्ही सीईओ या पदापर्यंत मजल मारत आहोत. अशात कोणी आमच्या पदाच्या चॉइसबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत. जर एखाद्या महिलेचे वय ५० वर्ष असेल अन् तिला तीन मुले असतील तर तिला असे विचारले जाऊ नये की, तू हे सर्व कसे मॅनेज करतेस. अखेरीस प्रियंकाने म्हटले की, यामुळेच सर, जर एक महिला अशा पुरुषाच्या कानशिलात मारत असेल जो तिची छेड काढत असेल तर तो त्याच लायक आहे. दरम्यान, प्रियंका सध्या भारतात परतली असून, बºयाचशा हिंदी प्रोजेक्टच्या तिला आॅफर्स आहेत. सध्या प्रियंका स्क्रिप्टवर काम करीत आहे. वृत्तानुसार प्रियंका सलमान खान आणि दिग्दर्शक अली अब्बाज जफरच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटात त्याच्या अपोझिट बघावयास मिळणार आहे. प्रियंका आणि सलमानने ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात काम केले होते.