Join us

​फेसबुकवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली प्रियंका चोप्रा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 15:18 IST

ग्लोबल सुपरस्टार प्रियांका चोप्रा सध्या आपल्या कामाने जगभरात आपलं वेगळं स्थान बनवतेय. पण त्यासोबतच ती भारतावरही आपली हुकूमत गाजवतेय. ...

ग्लोबल सुपरस्टार प्रियांका चोप्रा सध्या आपल्या कामाने जगभरात आपलं वेगळं स्थान बनवतेय. पण त्यासोबतच ती भारतावरही आपली हुकूमत गाजवतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर सर्वाधिक सर्च झालेली आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेली प्रियंका चोप्रा ‘मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ झालेली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, हे सिध्द झालेलं आहे की, 100 गुणांसह प्रियांका फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. नुकतेच बिग बी फेसबुकवर मोस्ट एंगेंजिंग सेलिब्रिटी झाले होते. त्यावेळी सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा मुद्दा बनला होता. स्कोर ट्रेंड्सनी काढलेल्या मोस्ट एंगेजिंग फिमेल सेलिब्रिटीजच्या लिस्टमध्ये प्रियंका चोप्रानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण 96 गुणांसह दुस-या स्थानी आहे. तर बकेट लिस्ट सिनेमामूळे ह्या लिस्टमध्ये तिस-या स्थानी धकधक गर्ल माधुरी दीक्षित 62 गुणांसह पोहोचली आहे. माधुरीनंतर मोस्ट एंगेजिंग महिला सेलिब्रिटीच्या यादीत सनी लिओन चौथ्या स्थानी तर कैटरीन कैफ पाचव्या स्थानी पोहोचलीय.काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राने रॉयल वेडिंग अटेंड केले होते. तसेच त्यानंतर ती बांगलादेशातल्या रोहिंग्याच्या मुलांना भेटली होती. ह्या यूनिसेफच्या उपक्रमामूळे आणि शाही विवाह सोहळ्यातल्या प्रियांकाच्या उपस्थितीमूळे ती चर्चेत राहिली होती. त्यामूळेच ती नंबर वन स्थानी पोहोचली. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "ह्या आठवड्यात प्रियंकाच्या पोस्ट्सवर आणि ऑफिशिअल पेजवर असलेल्या त्यांच्या फॉलोवर्सची 100 टक्के एंगेजमेंट दिसून आली. ज्यामूळे ती मोस्ट एंगेजिंग भारतीय सोलिब्रिटी ऑन फेसबुक झाली आहे.''ALSO READ :  विदेशी जावई नकोच! लेकीच्या रिलेशनशिपच्या बातम्यांवर बोलली प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा!सलमान खानच्या भारत चित्रपटात प्रियांका दिसणार आहे. ‘भारत’साठी प्रियांकाने मानधनापोटी भली मोठी रक्कम घेतल्याचे कळतेय. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ मध्ये प्रियांकासोबत कॅटरिना कैफ असल्याचेही मानले जात आहे.