Join us  

प्रियंका चोप्रा या हॉलिवूडपटाच्या शूटिंगसाठी पोहचली जर्मनीला, दिसणार या कलाकारांसोबत

By तेजल गावडे | Published: October 23, 2020 12:16 PM

प्रियंका आगामी हॉलिवूडच्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी जर्मलीना गेली आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. हॉलिवूडमध्ये बेवॉच आणि क्वांटिको सारख्या चित्रपटात काम केल्यानंतर आता तिने आणखी एका हॉलिवूडच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. सध्या प्रियंका आगामी हॉलिवूडच्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी जर्मलीना गेली आहे. बर्लिंनच्या गल्लांमधून रपेट मारतानाचे फोटो प्रियांकाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत तिचा कुत्राही दिसतो आहे. 

प्रियांका चोप्रा मॅट्रिक्स 4 या हॉलिवूडपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती जर्मनीला गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मॅट्रिक्स 4 हा सायन्स फिक्शन मूव्ही आहे. या प्रियांकाची भूमिका अत्यंत दमदार आहे. मॅट्रिक्स 4मध्ये प्रियांकासोबत कियानू रिव्ह्ज, कॅरी अ‍ॅनी मॉस हे कलाकार दिसणार आहेत. 

कोरोना व्हायरसचा फटका प्रियांकाच्या या चित्रपटाला बसला आहे. कोरोनामुळे मॅट्रिक्स 4चे शूटिंग पुढे ढकलावे लागले होते. हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. एकीकडे प्रियांका बर्लिनमध्ये मस्तपैकी फिरताना दिसत आहे तर दुसरीकडे तिचा सहकलाकार कियानू रिव्ह्जसुद्धा त्यांच्या गर्लंफ्रेंडसोबत भटकताना दिसून आला. त्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मॅट्रिक्स 4 या हॉलिवूडपटासोबतच प्रियांका काही बॉलिवूडच्या चित्रपटातही झळकणार आहे.

प्रियंका शेवटची द स्काय इज पिंक या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

त्यानंतर आता ती द व्हाईट टायगर चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राजर्मनीराजकुमार राव