Join us  

Priyanka & Nick Jonas Engagement :प्रतीक्षा संपली... निकची झाली प्रियांका चोप्रा; लग्नाचे काऊंटडाऊन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:07 PM

खुद्द प्रियांका आणि निकने अद्यापही माध्यमांसमोर त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नसली, तरीही आता मात्र थेट कलाविश्वाच्याच साक्षी ने ही जोडी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा झाल्याचे हा फोटोवरून स्पष्ट होते. 

आली लग्न घटिका समीप, करा हो लगीनघाई म्हणत अभिनेत्री  प्रियंका चोप्राचा बॉयफ्रेंड निक जोनासोबत लग्नासाठी काऊंटडाऊन  सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजच मुंबईत तिच्या राहत्या घरी तिने एका पुजेचे आयोजन केले होते. त्यात निक जोनास त्याच्या कुटुंबियांसह उपस्थित होता. गेल्या महिन्यात प्रियांकाच्या वाढदिवसाच्याच दिवशी निकने तिला प्रपोज केलं होतं. ज्यानंतर या सेलिब्रिटी जोडीवरच सर्वांच्या नजरा खिळल्या. खुद्द प्रियांका आणि निकने अद्यापही माध्यमांसमोर त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नसली, तरीही आता मात्र थेट कलाविश्वाच्याच साक्षी ने ही जोडी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा झाल्याचे हा फोटोवरून स्पष्ट होते. 

 

प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. वेगवेगळ्या प्रश्नांची होणा-या नवरीच्या मनात काहुर माजलेला असतो अशीच काहीशी अवस्था आता प्रियंकाची झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तिने आपली भावना मनात न ठेवता सोशल मीडियावर शेअर करत आहे.तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

विशेष म्हणजे प्रियंकाने त्यांच्या नात्याविषयी कधीच खुलेपणाने भाष्य केलं नाही. मात्र वर्षाच्या अखेरपर्यंत हे दोघं लग्नबंधनात अडकतील, असंच अनेकांना वाटत आहे. आता सगळ्यांच्या मनातील ही गोष्ट प्रत्यक्षात कधी घडणार याकडेच सा-यांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण प्रियंकाने ही बाब अनेकांपासून लपवली. मात्र आता प्रियंकाला तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करायची आहे असे वाटते आहे. कारण एक फोटो समोर आला असून त्यात प्रियंका रिंग दिसते आहे. 

 सोशल मीडियावर हा फोटो येताच वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या फोटोत प्रियांकाने डायमंड रिंग घातल्याचे दिसत आहे. या रिंगवरुनच तिचा साखरपुडा झाल्याचं पक्क मानलं जात आहे. अशातच आता या रिंगच्या किंमतीची चर्चा होऊ लागली आहे.  harpersbazaar.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने घातलेल्या रिंगची किंमत तब्बल २०० हजार डॉलर इतकी आहे. म्हणजे भारतीय किंमत १.५ कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. एका आंतरराष्ट्रीय जेमोलोजिस्टनुसार, ही ५ कॅरेटची रिंग आहे. रिंगमध्ये असलेल्या डायमंडला कुशन कट डायमंड म्हटले जाते. हा डायमंड सर्वात महागड्या डायमंडपैकी एक आहे.