Join us  

प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न लांबणीवर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 6:03 PM

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास हे कपल येत्या २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार, अशी बातमी होती. पण आता हे लग्न लांबणीवर पडल्याची खबर आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास हे कपल येत्या २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार, अशी बातमी होती. पण आता हे लग्न लांबणीवर पडल्याची खबर आहे. होय, प्रियांका व निकने यावर्षी नाही तर पुढील वर्षी जानेवारीत लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळतेय. चर्चा खरी मानाल तर दोघेही १४ वा १५ जानेवारीला लग्नबंधनात अडकू शकतात. दोघांच्याही कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे कळतेय. प्रियांका व निक दोघेही सध्या आपआपल्या करिअरमध्ये एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत. अनेक प्रयत्नांनी दोघांनीही आपले करिअर घडवले आहे. असे असताना हे करिअर सोडणे वा त्यातून बे्रक घेणे दोघांसाठीही सोपे नाही. त्यामुळे तूर्तास तरी कामापुढे काहीच नाही, असे दोघांचेही धोरण आहे. याचमुळे दोघांनीही लग्नाची तारीख लांबणीवर टाकल्याचे कळतेय.अर्थात दोन्ही कुटुंबात लग्नाची लगबग मात्र सुरू झाली आहे. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी तर कधीचीच लग्नाची खरेदी सुरू केली आहे. प्रियांका व निक दोघेही आपले लग्न यादगार बनवू इच्छितात. त्यामुळेच दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. प्रियांका व निक दोघेही हवाईमध्ये लग्न करू शकतात. प्रियाका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न समुद्राच्या कुशीत वसलेल्या हवाईला दोघांनीही पसंती दिली आहे. निकला समुद्र प्रचंड आवडतो. त्यामुळे याचठिकाणी हे जोडपे लग्नगाठ बांधेल, याची शक्यता अधिक आहे.प्रियांका सध्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. कालच प्रियांकाने या चित्रपटाचे लंडनमधील शूटींग शेड्यूल संपवले. या चित्रपटात प्रियांका अभिनेता फरहान अख्तरसोबत दिसणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास