Join us  

वाचा... का आलीय या अभिनेत्याच्या मुलावर फळं विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 5:07 PM

या अभिनेत्याच्या मुलाच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देप्रकाश राजने फोटोसोबत लिहिले आहे की, माझा मुलगा वेदांत हा कैऱ्या विकणारा बनला असून सध्या आम्ही आमच्या फार्म हाऊसवर आहोत. तुम्ही देखील तुमच्याच घरात राहा... ही वेळ देखील लवकरच निघून जाईल...

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. सध्या सगळेच सेलिब्रेटी आपापल्या घरात असून सोशल मीडियावर सक्रिय आहेत. प्रकाश राजने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

प्रकाश राजने त्याच्या फार्म हाऊसमधला एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर शेअर केला आहे. या फोटोत त्याचा मुलगा जमिनीवर बसला असून त्याच्यासमोर खूप साऱ्या कैऱ्या आहेत. तो या कैऱ्या विकत आहे का असा प्रश्न हा फोटो पाहून आपल्याला नक्कीच पडतो. प्रकाश राजचा मुलगा वेदांतचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या फोटोसोबत प्रकाश राजने कॅप्शन लिहिले आहे की, माझा मुलगा वेदांत हा कैऱ्या विकणारा बनला असून सध्या आम्ही आमच्या फार्म हाऊसवर आहोत. तुम्ही देखील तुमच्याच घरात राहा... ही वेळ देखील लवकरच निघून जाईल...

लॉकडाऊनच्या काळात प्रकाश राज त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चांगलाच सक्रिय आहे. त्याने काही दिवसांपूर्वी त्याचा मुलगा वेदांत सोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत तो चिमुकला आणि प्रकाश गाईच्या बछड्यासोबत असून त्यांच्यासोबत आपण मैत्री केली पाहिजे असे प्रकाश त्याच्या मुलाला सांगताना दिसत होता. 

प्रकाश राजने काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना मे महिन्यापर्यंतचा पगार दिला होता. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या संपूर्ण स्टाफला सुट्टी देखील दिली होती. त्यानंतर रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना त्याने आपल्या फार्म हाऊसमध्ये राहाण्याची परवानगी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश राज समाजोपयोगी अनेक कामं करत आहे. प्रकाश राज अनेक लोकांची दररोज जेवण्याची व्यवस्था करत असून अनेकांना त्याने धान्यं दिली आहेत.

टॅग्स :प्रकाश राज