Join us

प्राची-नर्गीसमध्ये आॅल इज नॉट वेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:45 IST

दोन तलवारी जशा एका म्यानमध्ये बसत नाहीत, त्याच प्रमाणे दोन हीरोईन्ससुद्धा एका चित्रपटात गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत. असे म्हणण्याचे ...

दोन तलवारी जशा एका म्यानमध्ये बसत नाहीत, त्याच प्रमाणे दोन हीरोईन्ससुद्धा एका चित्रपटात गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत. असे म्हणण्याचे कारण की, आगामी चित्रपट ‘अझहर’मध्ये प्राची देसाई आणि नर्गीस फाकरी या दोन नायिका काम करत आहेत आणि दोघींमध्ये सध्या ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याची चर्चा आहेप्राचीला असे वाटते की, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नर्गीसला जास्त फुटेज मिळाले आहे. त्यामुळे सर्वत्र नर्गीसच्या भूमिकेची चर्चा सुरू आहे. यामुळे असुरक्षित झालेली प्राची नर्गीसवर नाराज आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वादग्रस्त पूर्व कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित ‘अझहर’ चित्रपटात प्राची अझरुद्दीनच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारत आहे तर नर्गीस फिल्म अ‍ॅक्ट्रेस संगीता बिजलानीच्या भूमिकेत दिसणार.संगीता खुद्द हीरोइन असल्यामुळे अझहर व तिचे संबंध कसे होते हे जाणून घेण्यास सर्वच जण उत्सुक आहेत. कदाचित त्यामुळे निर्मात्यांनी नर्गीसला ट्रेलरमध्ये जास्त फोकस केले आहे. आता प्राचीला भीती वाटत आहे की, संपूर्ण चित्रपटात नर्गीस सगळा भाव खाऊन गेली तर?याविषयी प्राचीने कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले असून नर्गीसच्या प्रवक्त्याने याला अफवा म्हटलेले आहे. नर्गीस आणि प्राचीमध्ये कोणतेही हेवेदेवे नाही. आता धुर दिसतोय म्हटल्यावर आग तर लागलेलीच असणार ना.