Join us  

प्रभास आणि पूजा हेगडेचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'राधेश्याम'चे पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 5:49 PM

राधेश्याम चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट ‘राधेश्याम’च्या घोषणेपासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो आहे. प्रभासचे चाहते चित्रपटाशी जोडलेली प्रत्येक गोष्ट जाणण्यासाठी उत्सुक आहेत. चित्रपट त्याच्या पहिल्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. काही दिवसांपूर्वीच राधे श्याम या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर 'राधेश्याम' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. आता महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. भगवान शिव-पार्वती यांच्या अजरामर प्रेमकहाणीचं स्मरण करण्याच्या हेतूने हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

राधेश्याम चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे दिसून येत आहे. 'राधेश्याम' मध्ये अभिनेत्री 'पूजा हेगडे' मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले असून २०२१ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये प्रभास एका लक्झरी गाडीला टेकून उभा असल्याचे दिसून येत आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण जॉर्जिया येथे सुरु होते. मात्र, करोना विषाणूमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावर राहिले. त्यानंतर या चित्रपटाचे इटलीमध्ये चित्रीकरण सुरु आहे.

‘राधेश्याम’ एक बहुभाषीक चित्रपट असून राधा कृष्ण कुमार यांच्याद्वारे दिग्दर्शित करण्यात येत आहे. हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीज द्वारे प्रस्तुत आणि यूवी क्रिएशंस द्वारे निर्मित आहे. हा बिग बजेट ड्रामा, रोमँटिक चित्रपट आहे, ज्यामध्ये पूजा हेगडे आणि प्रभास यांच्याशिवाय भाग्यश्री, प्रियदर्शी, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर इत्यादी मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :प्रभासपूजा हेगडे