Join us  

क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर पूनम पांडेने पोस्ट केला Hot & Sexy फोटो, नेटिझन्सने दिल्या मजेशीर कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 12:46 PM

पूनम पांडेने ट्विटरवर नुकताच तिचा एक कमी कपड्यातील फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या ट्रान्सपरन्ट कपड्यांमध्ये तिने फोटो पोस्ट केला असून काहीच वेळात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देपूनमच्या या फोटोवर नेटिझन्सने मजेशीर कमेंट दिले आहेत तर काहींनी हा फोटो पाहून पूनमला चांगलेच सुनावले आहे. 2011 मध्ये तू दिलेले वचन पूर्ण केले नाहीस असे म्हणत काही जणांनी पूनमची टर उडवली आहे तर काही जणांनी तुझे कपडे कुठे आहेत असे तिला विचारले आहे. 

क्रिकेट मॅचेसची पूनम पांडे किती मोठी फॅन आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. भारताने क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला तर मी कपडे उतरवेन असे म्हणत 2011 च्या वर्ल्ड कप मॅचच्यावेळी पूनमने फुकटची पब्लिसिटी मिळवली होती आणि आता भारतीय टीमला काल मिळालेल्या विजयानंतर भारतीय टीमसाठी तिने एक नवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण या फोटोमुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच सुनावण्यात आले आहे. लोकांनी तिच्या फोटोवर मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत.

 

पूनम पांडेने ट्विटरवर नुकताच तिचा एक कमी कपड्यातील फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या ट्रान्सपरन्ट कपड्यांमध्ये तिने फोटो पोस्ट केला असून काहीच वेळात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर नेटिझन्सने मजेशीर कमेंट दिले आहेत तर काहींनी हा फोटो पाहून पूनमला चांगलेच सुनावले आहे. 2011 मध्ये तू दिलेले वचन पूर्ण केले नाहीस असे म्हणत काही जणांनी पूनमची टर उडवली आहे तर काही जणांनी तुझे कपडे कुठे आहेत असे तिला विचारले आहे. 

 

 

 

 

 

 

आयसीसी वर्ल्ड कप 2019 च्या काल रंगलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने विजय मिळवला. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळेल, याची सर्वांना खात्री होती. पण, नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानं विराट कोहलीची बाजू वरचढ ठरली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 352 धावांचा डोंगर उभा केला.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हळूहळू का होईना हा डोंगर सर करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकले होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी कामगिरीचा आलेख उंचावत त्यांना रोखले. भारताने 36 धावांनी हा सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलियाची सलग दहा सामन्यांतील अपराजीत मालिका खंडित झाली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 316 धावांत तंबूत परतला. भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा 50वा विजय ठरला. उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 137 सामन्यांत ऑस्ट्रेलियाने 77 विजय मिळवले आहेत.

टॅग्स :पूनम पांडेवर्ल्ड कप 2019