Join us  

पूनम पांडेने टॉपलेस फोटो शेअर करून विचारला प्रश्न, उत्तर देता-देता चाहते 'घामाघूम'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 4:21 PM

पूनम पांडेने नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोत सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

ठळक मुद्देपूनमने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून छातीवर हात ठेवला आहे आणि या फोटोवर एक खळबळजनक प्रश्न विचारला आहे. या प्रश्न कोणता आहे हे वाचून नेटिझन्सना देखील आश्चर्याचा धक्का बसत आहे.

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मी़डियावर नेहमीच व्हायरल होतात. ती स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करताना दिसते. पूनम ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी प्रसिद्ध अभिनेत्री इतकेच फॅन फॉलोव्हिंग तिला आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला 29 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. पूनमच्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. याच फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

पूनम पांडेने नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोत सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून छातीवर हात ठेवला आहे आणि या फोटोवर एक खळबळजनक प्रश्न विचारला आहे. या प्रश्न कोणता आहे हे वाचून नेटिझन्सना देखील आश्चर्याचा धक्का बसत आहे. पूनमच्या याच फोटोची सध्या सगळीकडे चर्चा आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार आहे.

पूनम पांडेने नशा या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सेक्सी अंदाजाची जास्त चर्चा रंगली होती. या चित्रपटाशिवाय ती शक्ती कपूरसोबत एका आयटम साँगवर थिरकली आहे. 

पूनम पांडे तिच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती. क्रिकेट मॅचेसची पूनम पांडे किती मोठी फॅन आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. भारताने क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला तर मी कपडे उतरवेन असे म्हणत 2011 च्या वर्ल्ड कप मॅचच्यावेळी पूनमने फुकटची पब्लिसिटी मिळवली होती. सध्या वर्ल्ड कपचे सामने सुरू असून या सामन्यानंतर ती अनेकवेळा आपले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते.

आयसीसी वर्ल्ड कप 2019 च्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्यावेळी तिने काळ्या रंगाच्या ट्रान्सपरन्ट कपड्यांमध्ये फोटो पोस्ट केला होता.  

टॅग्स :पूनम पांडे