Join us

​संयुक्त राष्ट्र संघात ‘पिंक ’चे स्पेशल स्क्रिनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 17:35 IST

अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित ‘पिंक’ चित्रपटाची समीक्षकांनी प्रशंसा केली. प्रेक्षकांनी देखील वेगळ्या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाला डोक्यावर घेतले. ...

अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित ‘पिंक’ चित्रपटाची समीक्षकांनी प्रशंसा केली. प्रेक्षकांनी देखील वेगळ्या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाला डोक्यावर घेतले. अनेक चित्रपट महोत्त्सवात या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले आहे. आता ‘पिंक’ या चित्रपटाची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. ‘पिंक’चे स्पेशल स्क्रिनिंग संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयी करण्यात येणार आहे.  महिलांच्या नकाराला देखील होकार समजणारा समाज महिलांच्या भावनांना का समजून घेत नाही हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉक येथील मुख्यालयी करण्यात येणार आहे ही बातमी अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. ‘सहाय्यक महासचिवांनी स्पेशल स्क्रिनिंगसाठी ‘पिंक’ची निवड केली आहे हा आमचा सन्मान आहे’ असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. }}}} महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पिंक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले होते. ‘पिंक’मध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे सादरीकरण, कलावंतांचा जबरदस्त अभिनय, आणि चित्रपटासाठी निवडलेला युनिक विषय यामुळे एकूणच या चित्रपटाची भट्टी चांगली जमली. ‘पिंक’ आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव व संदेश देतो. कोलकाता फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याला संबोधित करताना अमिताभ बच्चन यांनी ‘पिंक’ या चित्रपटाचा उल्लेख करताना,  लैंगिक संबंधावर महिलांच्या सहमतीवर सिनेमातून चर्चा करण्यात आली नव्हती, ‘पिंक’च्या माध्यमातून ती घडून येत आहे. देशात यावर चर्चा केली जात आहे असा उल्लेख केला होता.