Join us  

‘या’ व्यक्तीने सलमान खानसमोर त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफला डान्समध्ये म्हटले झिरो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 11:49 AM

सलमान खान आज जरी कॅटरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये नसला तरी, तो तिची प्रचंड काळजी घेताना बघावयास मिळतो. त्याचबरोबर त्यांच्यातील मैत्री अजूनही कायम असल्याचेही त्याने बºयाचदा दाखवून दिले आहे.

‘काला चश्मा, चिकनी चमेली, कमली ते शीला की जवानी...’ हे असे आयटम सॉन्ग्ज आहेत, जे तुम्हाला आपसुकच थिरकण्यास भाग पाडतात. शिवाय कॅटरिनाचे ठुमकेही डोळ्यासमोर तरळल्याशिवाय राहत नाहीत. अभिनयाबरोबर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करून कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकणाºया कॅटचा सध्या इंडस्ट्रीत जबरदस्त दबदबा आहे. परंतु तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, एक कोरिओग्राफर असाही आहे, ज्याने कॅटरिनाचे डान्सिंग स्किल्स बघून तिला झिरो रेटिंग दिली होती. विशेष म्हणजे, हे सर्व तिचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानच्या समोर घडले होते. याबाबतचा खुलासा स्वत: कॅटने एका व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. सध्या ‘हिचकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या राणी मुखर्जीने जेव्हा कॅटरिनाला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ‘हिचकी’बद्दल विचारले, तेव्हा कॅटने हा अतिशय जुना किस्सा सांगितला. व्हिडीओमध्ये कॅटरिना म्हणते की, ‘माझ्या आयुष्यात तशा बºयाचशा ‘हिचकी’ आल्या आहेत. परंतु सर्वात स्मरणात राहणारी ‘हिचकी’ डान्सिंगशी संबंधित आहे.’कॅटने सांगितले की, मी त्यावेळी एका तेलगू चित्रपटाच्या गाण्यात काम करीत होते. या चित्रपटात वेंकटेश अभिनेता होता. राजू सुंदरम यास कोरिओग्राफ करीत होते. मला असे वाटत होते की, मी खूप चांगला डान्स करीत आहे. परंतु ते मला खूप इरिटेट होत होते. वास्तविक त्यावेळी त्यांनी मला काहीही म्हटले नाही. काही आठवड्यानंतर राजू सुंदरम सलमान खानच्या ‘वॉन्टेड’च्या सेटवर आले. याठिकाणी मीदेखील उपस्थित होते. परंतु मी तिथे उपस्थित आहे हे राजूला माहिती नव्हते. सलमानने राजूला विचारले की, तू नुकतेच त्या मुलीसोबत म्हणजेच कॅटरिना कैफसोबत काम केले आहे. तिचा डान्स तुला कसा वाटला? याचे उत्तर देताना राजूने म्हटले की, ‘सर, ती झिरो आहे.’ राजूचे हे शब्द ऐकून कॅटला खूप मोठा धक्का बसला. तिला राजूचे हे शब्द खूपच जिव्हारी लागले. पुढे तिने मन लावून प्रॅक्टिस केली. पुढे सुनील दर्शन आणि धर्मेश दर्शनच्या सल्ल्यानुसार तिने वीरू कृष्णा यांच्याकडून क्लासिकल डान्स शिकला. सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत कॅट एका छोट्याशा रूममध्ये केवळ डान्सची प्रॅक्टिस करीत होती. त्यानंतर ‘रेस’च्या सेटवर कोरिओग्राफर बॉस्को सीजरने डान्सप्रती तिच्यातील आत्मविश्वास आणखी वाढविला. दरम्यान, कॅटरिना कैफ अखेरीस सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटामध्ये बघावयास मिळाली होती. चित्रपटातील तिच्या डान्स आणि अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले. सध्या ती दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहरूख खान आणि अनुष्का शर्मासोबत ती ‘झिरो’ हा चित्रपट करीत आहे, तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानसोबत ती ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ चित्रपटाची शूटिंग करीत आहे.