पीसीला मिळाला 'फेव्हरेट अँक्ट्रेस अँवॉर्ड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:55 IST
बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्रा हिला २0१६ च्या पीपल्स चॉईस अँवॉर्ड्स मध्ये नव्या टीव्ही सीरिजमध्ये फेव्हरेट ...
पीसीला मिळाला 'फेव्हरेट अँक्ट्रेस अँवॉर्ड'
बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्रा हिला २0१६ च्या पीपल्स चॉईस अँवॉर्ड्स मध्ये नव्या टीव्ही सीरिजमध्ये फेव्हरेट अँक्ट्रेस अँवॉर्ड मिळाला आहे. अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको' मध्ये तिने लीड भूमिका केली असून तिची निवड चाहत्यांकडूनच बेस्ट अँक्ट्रेस म्हणून झाली आहे. तिने एफबीआय एजंट अँलेक्स परिश हिची भूमिका केली आहे. तिच्यासोबत यात इम्मा रॉबर्ट्स, जेमी ली कुर्तीस, लिआ मायकेल आणि मारिआ गे हार्डन हे देखील आहेत. पीसीने अमेरिकन फॅशन डिझायनर वेरा वँग यांनी डिझाईन केलेला गोल्डन आणि सिल्व्हर रंगाचा ड्रेस घातला होता. तिचा मेकअप स्टेफनी बर्नेस हिने केला होता.