Join us  

अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 2:11 PM

Payal Rohatgi Arrested : बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. आता पायलने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे.

ठळक मुद्देपायल कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यावरून अनेकदा ती वादात सापडली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi ) वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. आता पायलने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. सोसायटी अध्यक्षाला धमकावल्याच्या आरोपाखाली अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली आहे. (Payal Rohatgi Arrested) ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, 20 जूनला सोसायटीच्या एजीएम मीटिंगमध्ये सदस्य नसूनही पायल रोहतगी सामील झाली. तिला बोलण्यास मनाई केल्यावर ती भडकली आणि तिने अश्लिल शिवीगाळ सुरू केली. सोसायटी चेअरमन व येथील रहिवास्यांना अश्लील भाषेत धमक्या दिल्या.  खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबण्याची धमकी दिली. शिवाय सोसायटीच्या आवारात जी मुलं खेळताना दिसतील त्यांचे हात पाय तोडेन असे देखील ती म्हणाली.

हे प्रकरण पोलिसात पोहोचले आणि अहमदाबाद सॅटेलाइट पोलिसांनी पायलला अटक केली. यापूर्वीही एकदा पायलला अटक झालेली आहे. राजस्थानच्या बूंदी पोलिसांनी पायलला अहमदाबादेतून अटक केली होती. यानंतर तिची जामीनावर सुटका झाली होती. 21 सप्टेंबर 2019 रोजी तिने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तिने नेहरुंवर आक्षेपार्ह आरोप केले होते.  आता तिने आणखी एक वाद अंगावर ओढून घेतला आहे.

पायल कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यावरून अनेकदा ती वादात सापडली आहे. पायलच्या करिअरबद्दल बोलाल तर पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2008 मध्ये ती बिग बॉस या रिअ‍ॅॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर 36  चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या ‘कापोर्रेट’ या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते.

टॅग्स :पायल रोहतगी