शिक्षणात नापास पण करिअरमध्ये झाले पास 'हे' स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 11:18 IST
कमी शिक्षण घेणाऱ्या अनेकांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करुन यशाची नवी गणित प्रस्थापित केली आहेत. बॉलिवूड जगही ...
शिक्षणात नापास पण करिअरमध्ये झाले पास 'हे' स्टार
कमी शिक्षण घेणाऱ्या अनेकांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करुन यशाची नवी गणित प्रस्थापित केली आहेत. बॉलिवूड जगही याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्ये आजच्या घडीचे असे अनेक कलाकार आहेत ज्य़ांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले मात्र त्यांच्या करिअरमध्ये ते यशस्वी झाले. आजच्या पिढीच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कॅटरिना कैफ तर आयुष्यात कधी शाळेत गेली नाही. कॅटरिनासारखे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले. असे कोणकोणते कलाकार आहेत त्यावर टाकूया एक नजर. कॅटरिना कैफकॅटरिना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. सात बहिणी आणि एक भाऊ असे कॅटरिनाचा मोठ कुटुंब होते. कॅटरिनाच्या आई-वडिलांच्या तिच्या लहानपणीच घटस्फोट झाला. त्यानतंर कॅटरिना आपल्या आईसोबत राहायला लागली. तिच्या आई समाजसेविका असल्यामुळे चीन, जपना, फ्रान्स, जर्मनी अशा अनेक देशांमध्ये कतरिना सतत फिरतीवर राहिली. तिच्यावर असलेल्या कुटुंबाच्या जबाबदारीमुळे वयाच्या 14 व्या वर्षी तिने मॉडलिंगला सुरुवात केली यामुळे ती कधीच शाळेत जाऊ शकली नाही. बूम या चित्रपटातून करिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कंगना रणौत बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगनाला लहानपणी अभिनेत्री नव्हे तर डॉक्टर बनायचे होते.डेहराडूनमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ती पुढील शिक्षणासाठी दिल्लीत आली. कंगना 12वीत नापास झाली. यानंतर तिने आपला मोर्चा मॉडलिंगकडे वळवला आणि आज ती बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्रींन पैकी एक आहे. अभिषेक बच्चनबीग बी अमिताभ बच्चन यांचा पुत्र अभिषेक बच्चन यांने पदवीची शिक्षणपण पूर्ण केले नाही आहे. दिल्लीतील मॉडर्न स्कूल, मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश शिक्षण घेतल्यानंतर त्यांने बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतले होते मात्र बॉलिवूडमध्ये हिरो बनण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. मग तिकडे शिक्षण अर्धवट सोडून तो मुंबईत हिरो बनण्यासाठी आला. काजोलकाजोल ही एक बंगाली आणि मराठी संस्कार असलेल्या कुटुंबात वाढलेली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी राहुल रावलच्या बेखुदी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि यामुळे ती तिचे पुढीचे शिक्षण पूर्ण करु शकली नाही. अर्जुन कपूरअर्जुन कपूर 12 वीत नापास झाला होता. नापास झाल्यानंतर त्यांने अभ्यासाला रामराम ठोकून अॅक्टिंगवर लक्ष केंद्रीत केले. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधी अर्जुनचे वजन 140 किलो होतो यावर मात करत अर्जुन आज बॉलिवूडलामधले करिअर यशस्वी केले आहे.