Join us  

लवकरच लग्न करणार 'कुछ-कुछ होता है'मधला सायलेंट सरदार, पण कुणासोबत अडकणार आहे लग्नाच्या बेडीत?

By गीतांजली | Published: October 26, 2020 1:03 PM

शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीच्या 'कुछ कुछ होता है' सिनेमातील क्यूट सरदारवर सगळे फिदा झाले होते.

शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीच्या कुछ कुछ होता है सिनेमातील क्यूट सरदारवर सगळे फिदा झाले होते. त्या क्यूट लहान सरदारची भूमिका परजान दस्तूरने साकारली होती. त्याने सिनेमात केवळ एकच डायलॉग म्हटंला होता, 'तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ।' जो हिट झाला होता.  

हाच सरदार परजान दस्तूर 2021 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. परजानने एका वर्षापूर्वीच डेलना श्रॉफसोबत साखरपुडा केला होता. त्यावेळी त्याने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात त्याने लिहिले होते की 2021मध्ये तो लग्न करणार आहे.  

परजानची आहे प्रॉडक्शन कंपनी परजाानने लिहिले, वर्षभरापूर्वी हाच सुंदर दिवस होता, जेव्हा तिने होकार दिला होता. आता केवळ महिने बाकी आहेत.  परजानने 'कुछ कुछ होता है'नंतर कहो ना प्यार है, हाथ का अंडा, ब्रेक के बाद, है दिल बार बार, हम तुम परजानिया, पॉकेट मम्मी, कभी खुशी कभी गममध्ये दिसला होता. 2009 मध्ये पीयूष झा यांच्या सिकंदर सिनेमात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. 

टॅग्स :शाहरुख खान