Join us

‘मेरी प्यारी बिंदू’साठी परिणीती रेडी!

By admin | Updated: April 22, 2016 01:36 IST

परिणीती चोप्रा ही तिचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’साठी तयार आहे. येत्या दोन आठवड्यांतच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

परिणीती चोप्रा ही तिचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’साठी तयार आहे. येत्या दोन आठवड्यांतच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ज्यात तिने कॅप्शन टाकले आहे की, ‘इन्स्पायर अ‍ॅण्ड रेडी फॉर माय फिल्म!! माय डायरेक्टर कॉट मी इन अ मोमेंट..’ परिणीती याअगोदर २०१४ मध्ये रोमँटिक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट ‘किल दिल’मध्ये दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटाला गुड विशेस देणाऱ्या फॅन्सना तिने थँक यू म्हटले आहे. मेरी प्यारी बिंदूची शूटिंग कोलकाता येथे होणार असून तिच्यासोबत आयुष्मान खुराना असेल. अक्षय रॉय हे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात डेब्यू करत असून मनिष शर्मा यांच्या निर्मिती बॅनरखाली चित्रपट रीलीज होईल.