Join us  

आता हा स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 1:44 PM

सध्या वरुण धवन, टायगर श्रॉफ, रणबीर कपूर, करिना कपूर, जान्हवी कपूर यांसारखे अनेक स्टार किड बॉलिवूडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्टार किडमध्ये आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश होणार आहे.

बॉलिवूडमध्ये स्टार किडने पदार्पण करण्यात काहीही नवीन नाही. सध्या वरुण धवन, टायगर श्रॉफ, रणबीर कपूर, करिना कपूर, जान्हवी कपूर यांसारखे अनेक स्टार किड बॉलिवूडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्टार किडमध्ये आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश होणार आहे.

कॉमेडी, गंभीर, भावनिक अशा सर्वच प्रकारच्या दमदार भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी आतापर्यंत सुमारे दोनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परेश रावल यांनी १९८५ साली अर्जुन या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटानंतर पुढच्याच वर्षी त्यांचा नाम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने त्यांना एक ओळख मिळवून दिली. आजवर त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांनी त्यांच्या कॉमिक आणि खलनायकी भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. त्यांच्या पत्नी स्वरूप संपत या देखील अभिनेत्री असून त्यांनी देखील अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. स्वरूप संपत यांनी १९७९ च्या मिस इंडियाच्या किताबावर नाव कोरले आहे. तसेच त्यांनी बऱ्याचशा चित्रपटांत आणि टीव्ही शोमध्येदेखील काम केले आहे. करिना कपूर आणि अर्जुन कपूरच्या की अँड का या चित्रपटामध्ये त्या झळकल्या होत्या. आता त्यांचा मुलगा आदित्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून बमफाड असे त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेला करत असून सना अमीन शेख या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. सनाने जीत जायेंगे हम, मन की आवाज प्रतिज्ञा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सिंघम आणि टेबल नं २१ यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील ती झळकली होती. पण पहिल्यांदाच ती एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

आदित्यने त्याच्या बमफाड या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे सुरू आहे. कानपूरमधील डी.एव्ही कॉलेज, मॉल रोडवरील रीटा हॉटेल आणि फुलबाजार येथे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. आदित्यने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी काही चित्रपटांचे लिखाण देखील केले आहे. 

 

टॅग्स :परेश रावल